नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विज चोरीचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर दीड लाखाची मागणी करुन एक लाख रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केल्यामुळे जळगाव येथील शनीपेठ पोलिस स्थानकात महावितरणच्या दोन कर्मचा-याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात जळगाव येथील महावितरणचे वायरमन धनराज वायरमन, व गोटू वायरमन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाई बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे २ डिसेंबर रोजी भरारी पथकाने एकूण पाच विज मिटर काढून तुमचे वीज मीटर नादुरुस्त आहे. तुमच्यावर जर विज चोरीचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर एकूण दीड लाख रुपयाची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी ३ डिसेंबर रोजी लाप्रवि जळगांव येथे समक्ष येऊन तक्रार दिली होती. तक्रारदाराने यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे लाच मागणी पडताळणी केली असता पंचा समक्ष यातील आलोसे १ व २ यांनी एका विज मीटरचे ३० हजार रुपये याप्रमाणे एकूण दीड लाख रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडीअंती एक लाख रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून शनिपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- लाच मागणी अहवाल*
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-30 रा. जळगांव जि. जळगांव
आलोसे 1) धनराज वायरम पुर्ण नाव माहित नाही आलोसे 2 ) गोटु वायरमन पुर्ण नाव माहित नाही दोन्ही नेम. मराविवि कं. मर्या. जळगांव
*लाचेची मागणी-प्रथम 1,50,000/- रुपये व तडजोडीअंती 1,00,000 रू
*लाच स्विकारली- निरंक
*हस्तगत रक्कम- निरंक
*लाचेची मागणी – दि.03/12/2024
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचे दि.02/12/2024 रोजी भरारी पथकाने एकूण पाच विज मिटर काढून तुमचे वीज मीटर नादुरुस्त आहे तुमच्यावर जर विज चोरीचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर एकूण 1,50,000/- रू .ची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.03/12/2024 रोजी लाप्रवि जळगांव येथे समक्ष येऊन तक्रार दिली होती . दि .03/12/2024 रोजी तक्रारदाराने यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे लाच मागणी पडताळणी केली असता पंचा समक्ष यातील आलोसे 1 व 2 यांनी एका विज मीटरचे 30 हजार रुपये याप्रमाणे एकूण 1,50,000 रू .लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1,00,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून शनिपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. - हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- पर्यवेक्षक अधिकारी- श्री योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि जळगांव
- सापळा अधिकारी – पोनि नेत्रा जाधव, लाप्रवि जळगांव
सापळा पथक – Psi दिनेशसिंग पाटील, पोना ,किशोर महाजन ,बाळू मराठे पोकॉ प्रदिप पोळ,अमोल सुर्यवंशी