नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या बाजूने निकाल लाऊन दिल्याचे मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाचे महसूल सहायक कैलास वैरागे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.4
या कारवाईबाबत दिलेली माहिती की, तक्रारदार हे व्यवसायाने वकील असुन त्यांचे पक्षकार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय नासिक येथे दाखल केलेल्या पुर्न निरिक्षण दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या पक्षकारांच्या बाजूने लाऊन देण्याचे व नंतर लागलेला निकाल जाणीवपूर्वक विलंबाने अपलोड करून तो तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या बाजूने लाऊन दिल्याचे मोबदल्यात वेळोवेळी फोनवरून तक्रारदार यांच्याकडे ३० हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून आलोसे यांचे विरुध्द नासिक रोड पोलीस स्टेशन, नाशिक शहर, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच मागणी प्रकरणी कारवाई’
- ’युनिट .’ नाशिक
- ’तक्रारदार.’ पुरूष वय 59 वर्षे
- आलोसे.– श्री कैलास पाराजी वैरागे, वय 51 वर्ष, महसूल सहाय्यक, (वर्ग 3 ) नेमणूक – विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रा. शिवदर्शन सोसायटी फ्लॅट नंबर 1, नाशिक रोड कोर्टाच्या मागे, नाशिक रोड, नाशिक.
- *मागणी केलेली लाचेची रक्कम- 30,000
- लाच मागणी दिनांक – दि. 29/8/24, दि. 31/8/24 व दि 6/9/24 रोजी
- तक्रार- यातील तक्रारदार हे व्यवसायाने वकील असुन त्यांचे पक्षकार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय नासिक येथे दाखल केलेल्या पुर्न निरिक्षण दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या पक्षकारांच्या बाजूने लाऊन देण्याचे व नंतर लागलेला निकाल जाणीवपूर्वक विलंबाने अपलोड करून तो तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या बाजूने लाऊन दिल्याचे मोबदल्यात वेळोवेळी फोनवरून तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून आलोसे यांचे विरुध्द नासिक रोड पोलीस स्टेशन, नाशिक शहर, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. जिल्हाधिकारी, जळगाव
*सापळा अधिकारी – अनिल बडगुजर पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. नाशिक
*सापळा पथक’ – पोहवा / दीपक पवार, पोहवा/ संदीप हांडगे, पोशी/ संजय ठाकरे, चालक पोहवा/विनोद पवार