नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडिलोपार्जित शेत जमीन वरून तकारदार यांचे बहिणीचे हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी व सातबारा उत्तारे देण्याच्या मोबदल्यात ३ हजाराची लाच मागणा-या तलाठीसह एका खासगी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची भडगांव तालुक्यातील सावदे शिवारातील वडिलोपार्जित शेत जमीन आहे. सदर जमीन वरून तकारदार यांचे बहिणीचे हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी व सातबारा उत्तारे देण्याच्या मोबदल्यात यातील तलाठी विलास शेळके व खासगी व्यक्ती धिरज यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम ४ हजार, लाचेची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून भडगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
- लाच मागणी अहवाल*
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-49 रा. कोळगांव ता. भडगांव जि. जळगांव
आलोसे 1) विलास बाबुराव शेळके , व्यवसाय नोकरी ,तलाठी सजा प्रिंपीहाट ता.भडगांव
2) धिरज पुर्ण नाव माहित नाही ( खाजगी इसम मदतनीस ) *लाचेची मागणी- प्रथम 4,000/- रुपये व तडजोडीअंती 3,000 रू
*लाच स्विकारली- निरंक
*हस्तगत रक्कम- निरंक
*लाचेची मागणी- दि.04/12/2024
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांची भडगांव तालुक्यातील सावदे शिवारातील वडिलोपार्जित शेत जमीन आहे. सदर जमीन वरून तकारदार यांचे बहिणीचे हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी व 7/12 उत्तारे देण्याच्या मोबदल्यात यातील आलोसे क्रमांक 1 ते 2 यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम 4 हजार, लाचेची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून भडगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. - हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- सापळा व तपास अधिकारी – श्री योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि जळगांव
- सापळा पथक – Psi दिनेशसिंग पाटील, मपोहेकॉ शैला धनगर, पोकॉ राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी