नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतजमिनी बाबत ग्रामपंचायत कडून कोर्टकचेऱ्यांचा त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल असे सांगितले पण, तक्रारदार यांनी नकार दिल्याने चाळीसगाव येथील बहाळ येथील सरपंच राजेंद्र मोरे व शिपाई शांताराम तुकाराम बोरसे यांनी दहा लाखाच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडी अंती ५ लाखाची लाच घेण्याचे मान्य केले व त्यानंतर पहिला हप्ता दोन लाख खासगी व्यक्ती सुरेश ठेंगे मार्फत घेतला. त्यामुळे लाच लुचपत विभागाने कारवाई केली.
या कारवाईबाबत दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची मौजे बहाळ रथाचे ता.चाळीसगाव, जि जळगाव येथे गट क्रमांक 57/2 क्षेत्र 1हेक्टर 64 आर अशी शेत जमीन असून सदर शेतजमिनीवर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी ग्रामपंचायती विरुद्ध मा. न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता. त्यानंतर आलो सरपंच मोरे यांनी तक्रारदार यांना भेटून त्यांच्या शेतजमिनी बाबत ग्रामपंचायत कडून कोर्टकचेऱ्यांचा त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल असे सांगितले त्या तक्रारदार यांनी नकार दिल्याने सरपंचे मोरे यांनी दहा लाख रुपयाच्या लाचेची मागणी केल्याची ला प्र.वि धुळे कार्यालयाकडे तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीची २९ नोव्हेंबर रोजी पंचांग समक्ष पडताळणी केली असता आलोसे सरपंच मोरे व शिपाई बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून देण्याच्या स्वरूपात लाचेची मागणी केली असता, त्यास तक्रारदार यांनी नकार दिला. त्यानतंर दोघांनी दहा लाखाची मागणी करून तडजोडी अंती ५ लाख रुपये लाच स्वीकारल्याचे मान्य केले होते.
त्याप्रमाणे २६ डिसेंबर रोजी तक्रारदार यांचे बहाळ येथील राहत्या घरी सापळा लावला असता आलोसे सरपंच व शिपाई यांनी सांगितल्याप्रमाणे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता दोन लाख रुपये पंचांसमक्ष स्वीकारताना खासगी व्यक्ती सुरेश ठेंगे यांना रंगेहात पकडण्यात आले.
युनिट – ला.प्र.वि. धुळे
तक्रारदार- पुरुष, वय-70 वर्ष
आरोपी– 1) राजेंद्र महादू मोरे, वय – 57 रा. बहाळ , ता. चाळीसगाव
पद -सरपंच ग्रामपंचायत बहाळ रथाचे, ता चाळीसगाव, जि. जळगाव.
2) शांताराम तुकाराम बोरसे, वय 50 वर्ष,रा. बहाळ रथाचे पद- (ग्रामपंचायत शिपाई )ता.चाळीसगाव, जि.जळगाव
3) सुरेश सोनू ठेंगे, वय 40 वर्ष, व्यवसाय – शेती, रा.बहाळ ता.चाळीसगाव, जळगाव (खाजगी इसम)
*लाचेची मागणी– दिनांक 29.11.2024 रोजी 10,00,000/- रू मागणी करून तडजोडी अंती 5,00,000/-लाख लाच स्वीकारली
दिनांक 26.12.2024 रोजी पहिला हप्ता 2,00,000/-रू. आरोपी क्र. 03 यांनी पंचासमक्ष स्वीकारली.
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांची मौजे बहाळ रथाचे ता.चाळीसगाव, जि जळगाव येथे गट क्रमांक 57/2 क्षेत्र 1हेक्टर 64 आर अशी शेत जमीन असून सदर शेतजमिनीवर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी ग्रामपंचायती विरुद्ध मा. न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता.
त्यानंतर आलो क्र. 1 यांनी तक्रारदार यांना भेटून त्यांच्या शेतजमिनी बाबत ग्रामपंचायत कडून कोर्टकचेऱ्यांचा त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल असे सांगितले त्या तक्रारदार यांनी नकार दिल्याने आलोसे क्र. 1 यांनी 10,00,000/- रू. लाचेची मागणी केल्याची ला प्र.वि धुळे कार्यालयाकडे तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीची दि. 29/11/2024 रोजी पंचांग समक्ष पडताळणी केली असता आलोसे क्र. 01 व 02 यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून देण्याच्या स्वरूपात लाचेची मागणी केली असता, त्यास तक्रारदार यांनी नकार दिल्याने आलोसे क्र. 01 व 02 यांनी 10,00,000/- रू लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5,00,000/- रुपये ला स्वीकारल्याचे मान्य केले होते.
त्याप्रमाणे आज दि.26.12.2024 रोजी तक्रारदार यांचे बहाळ येथील राहत्या घरी सापळा लावला असता आलोसे क्र. 01 व 02 यांनी सांगितल्याप्रमाणे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता 2,00,000/-रुपये पंचांसमक्ष स्वीकारताना आरोपी क्र.3) यांना रंगेहात पकडण्यात आले म्हणून गुन्हा
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी– मा.विभागीय आयुक्त नासिक.
परिवेक्षण अधिकारी- श्री. सचिन साळुंखे
*पोलीस उपअधिक्षक – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सापळा अधिकारी – पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक*
लाचलुचपात प्रतिबंधक विभाग धुळे.
सापळा पथक–
पो.हवा.राजन कदम,पो. हवा. पावरा, सुधीर मोरे, पो.शि.रामदास बारेला, प्रवीण पाटील सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे.