इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाच लाख रुपयाच्या लाच प्रकरणात पुणे – सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने संयुक्तिकपणे मोठी कारवाई करत जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश धनजंय निकम यांच्यासह तिघांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे न्यायपालिका क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काहींना गजाआड करण्यात आले आहे.
जामिन देण्यासाठी फिर्यादीच्या वडिलांकडून पाच लाख रुपये मागण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या सर्व घडामोडी सत्र न्यायालयाच्या आवारात घडल्या. त्यानंतर एका हॅाटेलमध्ये एसबीच्या पथकाने सापळा रचून सर्वांना रंगेहात पकडले. आतापर्यंत अनेक अधिकारी व कर्मचारी एसीबीच्या कारवाईत सापडले. पण, न्यायाधीशच त्यांच्या हाती लागल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.