नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद नवले यांना ८ हजार रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले यांना ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे कार्यालयाचे दप्तर तपासणीसाठी सदर नवले येणार होते, तरी कार्यालयात तक्रारदार यांची टेबलाची तपासणी व्यवस्थित करून देतो व तपासणी बाबत चांगला अहवाल देतो असे म्हणुन यातील मव यांनी ३००० रुपये तीन हजार रुपयाची लाचेची मागणी केली . तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र हिसवळ ता. नांदगाव या कार्यालयातील निलंबित झालेला कर्मचारी प्रशांत जमदाडे याची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात चौकशी सुरू असून तेथे माझी ओळख आहे असे सांगुन त्याला भेटून मला ५००० रुपये आणून द्या ,मी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून त्याची चौकशी क्लिअर करून आणतो असे सांगून एकूण ८००० हजार लाचेची मागणी करून यातील आलोंसे हे ८००० रुपये घेताना रंगेहात मिळून आले.म्हणून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा आहे. आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्याचे विरुद्ध नांदगाव पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामिण येथे दाखल गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
’यशस्वी सापळा कारवाई’’
- युनिट -नाशिक
- ’तक्रारदार.-पुरूष वय 46 वर्षे
-1) आलोसे. श्री. प्रमोद रंगनाथ नवले, वय 46 वर्षे, व्यवसाय- नोकरी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती नांदगाव वर्ग -3 रा .महाजन वाडा ,मुक्ताई नगर मालेगाव रोड नांदगाव
पिन 423106 - ’लाचेची मागणी- 8000/-
- ’लाच स्विकारली- 8000/-
- ’हस्तगत रक्कम. 8000/-
- ’लाचेची मागणी’ – दिनांक -10/12/24 रोजी
- ’लाच स्विकारली’ – दिनांक -10/12/24 रोजी
-लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचे कार्यालयाचे दप्तर तपासणीसाठी सदर आलोसे येणार होते , तरी कार्यालयात तक्रारदार यांची टेबलाची तपासणी व्यवस्थित करून देतो व तपासणी बाबत चांगला अहवाल देतो असे म्हणुन यातील आलोंसे यांनी 3000 रुपये तीन हजार रुपयाची लाचेची मागणी केली . तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र हिसवळ ता. नांदगाव या कार्यालयातील निलंबित झालेला कर्मचारी प्रशांत जमदाडे याची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात चौकशी सुरू असून तेथे माझी ओळख आहे असे सांगुन त्याला भेटून मला 5000 रुपये आणून द्या ,मी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून त्याची चौकशी क्लिअर करून आणतो असे सांगून एकूण 8000 हजार लाचेची मागणी करून यातील आलोंसे हे 8000/- रुपये घेताना रंगेहात मिळून आले.म्हणून त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम. 7 अन्वये गुन्हा आहे. आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्याचे विरुद्ध नांदगाव पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामिण येथे दाखल गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे .
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- आलोसे यांचे सक्षम अधिकारी– मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांना कळविण्यात आले आहे .
- *सापळा अधिकारी- *श्री. एकनाथ गं. पाटील पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक .*
- सापळा पथक– पोहवा.सुनील पवार, पोहवा संदीप वणवे, पोहवा . योगेश साळवे, सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक युनिट .