नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाळू वाहतुकीचा व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी १५ हजाराची लाच घेतांना कोपरगाव तहसील कार्यालयातील लिपीक चंद्रकांत चांडे, अव्वल कारकून योगेश पालवे यांच्यासह एक खासगी व्यक्ती प्रतीक कोळपे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून ते सदरील व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी आलोसे चांडे व पालवे यांनी आरोपी खाजगी इसम नामे प्रतीक कोळपे यांचे मार्फत तक्रारदार यास दरमहा १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार केली होती. त्यावरून दिनांक ६ डिसेंबर रोजी पंचा समक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत चंद्रकांत चांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली व मागणी केलेली लाचेची रक्कम खाजगी इसम प्रतीक कोळपे याचेकडे देण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी कोळपे यास संपर्क केला असता त्याने चांडे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर पालवे व चांडे यांना फोन द्वारे प्रतीक कोळपे यांनी १५ हजार रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारले बाबत सांगितले. त्यानंतर चंद्रकांत चांडे, योगेश पालवे यांनी खाजगी इसम प्रतीक कोळपे यास सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली.
त्यामुळे तिघां विरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ अ व 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
’यशस्वी सापळा कारवाई’
- ’युनिट .’ नाशिक
*’तक्रारदार.’ पुरूष वय ३६ वर्षे
*1) आलोसे. श्री. चंद्रकांत नानासाहेब चांडे वय 39 वर्षे, व्यवसाय-नोकरी (लिपीक, वर्ग-3, तहसील कार्यालय, कोपरगाव) रा. कला साई, बंगला समयक नगर, कोपरगाव.423601
2) श्री. योगेश दत्तात्रय पालवे, वय -45, व्यवसाय- नोकरी (अव्वल कारकून वर्ग-3,तहसील कार्यालय, कोपरगाव)
3) खाजगी इसम- प्रतीक कोळपे उर्फ खाऱ्या, वय – 23, व्यवसाय – वाळू वाहतूक, रा – कोळपेवाडी, जिल्हा – अहिल्या नगर - ’लाचेची मागणी – 15000/-
*’लाच स्विकारली – 15000/- - ’हस्तगत रक्कम – 15000/-
- ’लालेची मागणी – दिनांक ०६/१२/२०२४ रोजी
*’लाच स्विकारली – दिनांक ०९/१२/२०२४ रोजी - तक्रार-यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून ते सदरील व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी आलोसे क्रमांक 1) चांडे व आलोसे क्रमांक 2) पालवे यांनी आरोपी खाजगी इसम नामे प्रतीक कोळपे यांचे मार्फत तक्रारदार यास दरमहा 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार केली होती. त्यावरून दिनांक ०६/१२/२०२४ रोजी पंचा समक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत आलोसे क्र.१). चंद्रकांत चांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली व मागणी केलेली लाचेची रक्कम खाजगी आरोपी इसम नामे प्रतीक कोळपे याचेकडे देण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी खाजगी ईसम नामे प्रतीक कोळपे यास संपर्क केला असता त्याने आलोसे नामे चांडे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर आरोपी क्र. 2) पालवे व आरोपी क्र.१) चांडे यांना फोन द्वारे आरोपी क्रमांक 3) खाजगी इसम प्रतीक कोळपे यांनी १५,०००/- रु.लाचेची रक्कम स्वीकारले बाबत सांगितले असता आलोसे चंद्रकांत चांडे व आलोसे योगेश पालवे यांनी खाजगी इसम प्रतीक कोळपे यास सदर लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली.
आलोसे व आरोपी खाजगी इसम यांचे विरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन पोलीस , जिल्हा अहिल्यानगर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम ७, ७ अ व 12 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. - आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. जिल्हाधिकारी, जिल्हा अहिल्यानगर
- सापळा अधिकारी- संतोष रवींद्र पैलकर, पोलीस उपधीक्षक ला. प्र. वि. नाशिक
- सह सापळा अधिकारी – श्री संदीप घुगे
- पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. नाशिक
- ’सापळा पथक – पोलीस हवालदार दिनेश खैरनार, पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, पोलीस नाईक अविनाश पवार, पोलीस शिपाई नितीन नेटारे