नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण मंजूर करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या नगर रचना विभाग नगर रचना सहाय्यक मनोज वन्नेरे हे १५ हजाराच्या लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण मंजूर करण्यासाठी परवानगी साठी नगर रचना विभाग मनपा जळगांव येथे एकूण तीन प्रकरणे दाखल केली आहेत. त्यात पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी पाठवले असता वन्नेरे यांनी पहिल्या प्रकरणात २१ हजार व तडजोड अंती १५ हजार व व दुसऱ्या प्रकरणात १५ हजार रुपयाची आयुक्त, मनपा जळगाव व सहाय्यक संचालक (अतिरिक्त कार्यभार ) नगर रचना विभाग, मनपा जळगाव यांचेसाठी एकूण ३० हजाराची मागणी करून पहिल्या प्रकरणात १५ हजार रुपये स्वीकारले म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- यशस्वी सापळा कारवाई*
- युनिट -* जळगाव.
- तक्रारदार-* पुरुष,वय-34 रा. खेडी बु.जि. जळगांव
- आलोसे मनोज समाधान वन्नेरे, वय 34 वर्षे, व्यवसाय नोकरी , नगर रचना सहाय्यक, नेम. नगर रचना विभाग, मनपा जळगांव ( वर्ग 3 )
- लाचेची मागणी-* एका प्रकरणात प्रथम 21,000/- व तडजोडीअंती 15,000 रू व दुसऱ्या प्रकरणात 15000/- रु. अशी एकूण 30000/- रू. लाचेची मागणी
*लाच स्विकारली- पहिल्या प्रकरणात 15,000/-
*हस्तगत रक्कम- 15,000/-
*लाचेची मागणी – दि.09/12/2024
*लाच स्विकारली – दि.09/12/2024
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांनी बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण
मंजूर करण्यासाठी परवानगी साठी नगर रचना विभाग मनपा जळगांव येथे एकूण 3 प्रकरणे दाखल केली आहेत. त्यात पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी पाठवले असता आलोसे यांनी पहिल्या प्रकरणात 21000 व तडजोड अंती 15000 व व दुसऱ्या प्रकरणात 15000 रुपयाची आयुक्त, मनपा जळगाव व सहाय्यक संचालक (अतिरिक्त कार्यभार ) नगर रचना विभाग, मनपा जळगाव यांचेसाठी एकूण 30000 ची मागणी करून पहिल्या प्रकरणात 15000 रुपये आज रोजी स्वीकारले म्हणून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
*सापळा अधिकारी व तपास अधिकारी- श्री योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि जळगांव
*सापळा पथक – Psi दिनेशसिंग पाटील, Psi सुरेश पाटील, पोना किशोर महाजन , राकेश दुसाने