नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासनाकडून प्राप्त अनुदान म्हणुन विवीध कामासाठी आलेल्या निधीच्या प्रथम १० टक्के रक्कम मागणी करुन, नंतर लाच म्हणुन २० हजार रुपये घेतांना दिंडोरी पंचायत समितीचे तालुका वैद्यकिय अधिकारी सुभाष हरीभाऊ मांडगे हे एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या विरुध्द म्हसरुळ पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचेकडे सरकारी आयुर्वेद दवाखाना, कोषींबे ता. दिंडोरी या दवाखान्यास सन 2020-2021 ते 2023-2024 पावेतो शासनाकडून प्राप्त अनुदान म्हणुन विवीध कामासाठी आलेला 2,27,000/- रुपये निधीच्या प्रथम 10 टक्के रक्कम मागणी करुन, नंतर लाच म्हणुन 20000/- रुपये रक्कमेची लाचची मागणी करुन, सदरची लाच रक्कम सोमवारी कलानगर, म्हसरुळ ता. जि. नाशिक येथे पंच साक्षीदार यांचे समक्ष स्विकारली असता, रंगे हाथ पकडण्यात आले.
’यशस्वी सापळा कारवाई’
- ’युनिट .’ नाशिक
- ’तक्रारदार.’ पुरूष वय ५० वर्षे
- आलोसे. श्री सुभाष हरीभाउ मांडगे वय 44 वर्षे, व्यवसाय-नोकरी (तालुका वैदयकीय अधिकारी, वर्ग-1, दिंडोरी पंचायत समिती, दिंडोरी जि. नाशिक ) रा. प्लॅट नं. 2, श्री शक्ती अपार्टमेंट, कलानगर, म्हसरुळ ता. जि. नाशिक 422004
- ’लाचेची मागणी. – 20000/-
- ’लाच स्विकारली – 20000/-
- ’हस्तगत रक्कम – 20000/-
- ’लालेची मागणी – दिनांक २८/१०/२०२४ रोजी
- ’लाच स्विकारली – दिनांक २५/११/२०२४ रोजी
-तक्रार-यातील तक्रारदार हे सरकारी आयुर्वेद दवाखाना, कोशींबे ता. दिंडोरी येथे वैदयकीय अधिकारी या पदावर कार्यरत असुन, त्यांचे सदर दवाखान्यास सन 2020-2021 ते 2023-2024 पावेतो शासना कडुन प्राप्त अनुदान म्हणुन विवीध कामासाठी आलेला 2,27,000/- असा निधी दवाखान्याच्या विवीध कामासाठी वापरण्यात आला असुन, सदर खर्चाबाबतचे लेखा परिक्षण झाले आहे. तरी देखील आलोसे यांनी तक्रादार यांचेकडे वर नमुद कालावधीत शासनाकडून प्राप्त एकुण 2,27,000/- रुपये निधीवर कमीशन म्हणुन काही रक्कम लाचेची मागणी केल्याने, तक्रादार यांना आलोसे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे दिनांक 28/10/2024 रोजी पडताळणी दरम्यान दिंडोरी पंचायत समीती येथील आलोसे यांचे कार्यालयात पंच साक्षीदार यांचे समक्ष आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे सरकारी आयुर्वेद दवाखाना, कोषींबे ता. दिंडोरी या दवाखान्यास सन 2020-2021 ते 2023-2024 पावेतो शासनाकडून प्राप्त अनुदान म्हणुन विवीध कामासाठी आलेला 2,27,000/- रुपये निधीच्या प्रथम 10 टक्के रक्कम मागणी करुन, नंतर लाच म्हणुन 20000/- रुपये रक्कमेची लाचची मागणी करुन, सदरची लाच रक्कम आज दिनांक 25/11/2024 रोजी कलानगर, म्हसरुळ ता. जि. नाषिक येथे पंच साक्षीदार यांचे समक्ष 2,27,000/- रु. च्या 10 टक्के रक्कम बक्षीस स्वरुपात लाच म्हणुन 20000/- रु स्विकारली असता, रंगे हाथ पकडण्यात आले असुन, आलोसे यांचे विरुध्द म्हसरुळ पोलीस स्टेषन, नाशिक शहर, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हाह दाखल करण्यात येत आहे.
- आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. अवर सचिव, आरोग्य सेवा, मंत्रालय मुंबई
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- ’सापळा अधिकारी – श्री नितीन पाटील पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. नाशिक मोबा नं. ९२८४६६१६५८
- ’सापळा पथक – पोलीस नाईक विनोद चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव