नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवैध दारूची केस न करण्यासाठी भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक किरण सोनवणेसह खासगी इसम ३० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या दोघांवर फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिेलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचेकडेस 19/11/2024 रोजी यातील किरण सोनवणे यांनी व त्याचेसोबत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने तक्रारदार यांचे घरी जाऊन अवैध दारू विक्री बाबत छापा टाकला होता. सदरचा छापा मध्ये तक्रारदार यांचेकडेस असलेला ३० ते ३५ हजार रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या होत्या व दारूची केस न करण्यासाठी १० हजार रुपये घेतले होते. दारूची केस न करण्यासाठी तक्रारदार यांच्या कडून ५० हजार रुपये ची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी आज दिनांक 22/11/2024 रोजी तक्रारदार यांनी समक्ष लाप्रवि जळगांव यांना तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान दोन्ही आरोपीनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदार यांना त्रास न देण्यासाठी प्रथम ५० हजार रुपयाची मागणी करून तडजोड अंती ३० हजार रुपयाची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. 22/11/2024 रोजी यातील आरोपी क्रमांक २ खाजगी इसम यास ३० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रांगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचेवर फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – जळगाव.
*तक्रारदार- पुरुष,वय-35 रा. जि. जळगांव
आलोसे क्र.1) किरण सोनवणे, वय 39 वर्षे, व्यवसाय नोकरी, उप निरीक्षक, नेम. राज्य उत्पादन शुल्क विभाग, भुसावळ ( वर्ग 2 )
2) किरण माधव सुर्यवंशी, वय 37,धंदा – मजुरी, रा. हुडको कॉलनी भुसावळ ( खाजगी इसम)
*लाचेची मागणी- प्रथम 50000 / -रुपये व तडजोडी अंती .30000 रू
*लाच स्विकारली- 30,000/-
*हस्तगत रक्कम- 30000/-
*लाचेची मागणी – दि.22/11/2024
*लाच स्विकारली – दि.22/11/2024
लाचेचे कारण*
यातील तक्रारदार यांचेकडेस दि.19/11/2024 रोजी यातील आलोसे क्र.1 यांनी व त्याचेसोबत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने तक्रारदार यांचे घरी जाऊन अवैध दारू विक्री बाबत छापा टाकला होता. सदरचा छापा मध्ये तक्रारदार यांचेकडेस असलेला 30 ते 35 हजार रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या होत्या व दारूची केस न करण्यासाठी 10 हजार रुपये घेतले होते. दारूची केस न करण्यासाठी तक्रारदार यांच्या कडून 50 हजार रुपये ची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी आज दिनांक 22/11/2024 रोजी तक्रारदार यांनी समक्ष लाप्रवि जळगांव यांना तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान दोन्ही आरोपीनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदार यांना त्रास न देण्यासाठी प्रथम 50000 ची मागणी करून तडजोड अंती 30000 रुपयाची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. आज दि.22/11/2024 रोजी यातील आरोपी क्रमांक 2 खाजगी इसम यास 30000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रांगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचेवर फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा परिवेक्षणअधिकारी – श्री योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक,लाप्रवि जळगांव
*सापळा व तपास अधिकारी – श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक,लाप्रवि जळगांव.
*सापळा पथक – पोना/ बाळू मराठे, पोकॉ/राकेश दुसाने