नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासकीय गोदामातील कंत्राटदाराला ७०० अतिरिक्त बारदान त्यांना इच्छा नसताना दिले व त्या बदल्यात ५००० हजाराची लाच घेतली. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली आहे. या सापळा कारवाईत गोदाम व्यवस्थापक नंदकिशोर वाघ व मुकादम हमजेखान महेमुदखान पठाण यांच्यावर एरंडोल पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबी दिेलेली माहिती अशी की, तक्रारदार यांना शासकीय गोदाम मधून बारदान (रिकाम्या गोण्या) विकत घेण्याचे कंत्राट जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडून मिळाले आहे. वाघ हे शासकीय धान्य गोदाम, एरंडोल चे गोडावून कीपर आहेत व पठाण हे कंत्राटदार मुकादम आहेत. तक्रारदार यांनी त्यांना कंत्राट प्रमाणे नेमून दिलेले बारदान गोडावून मधून उचल्यानंतर वाघ व पठाण यांनी ७०० अतिरिक्त बारदान त्यांना इच्छा नसताना दिले. त्यानंतर त्या बदल्यात ७००० ची मागणी केली. असे न केल्यास तुझा कंत्राट रद्द करू व भविष्यात कंत्राट मिळू देणार नाहीत असे सांगितले. म्हणून तक्रारदार यांनी समक्ष तक्रार दिली.
पडताळणी कारवाई दरम्यान दोन्ही आरोपीनी अतिरिक्त दिलेल्या बारदानच्या मोबदल्यात प्रथम ७०००, ६०००, ५५५० ची मागणी करून तडजोड अंती ५००० रुपयाची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. आज यातील आरोपी पठाण मुकादम यास ५००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रांगेहाथ पकडण्यात आले आहे. दोन्ही आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर एरंडोल पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – जळगाव.
तक्रारदार- पुरुष,वय-47 रा. जळगांव जि. जळगांव
आलोसे क्र.1) नंदकिशोर रघुनाथ वाघ, वय 47 वर्षे, व्यवसाय नोकरी , गोदाम व्यवस्थापक (अव्वल कारकून ) शासकीय गोदाम, एरंडोल . रा . श्रीराम कॉलनी, बालाजी शाळेच्या मागे, एरंडोल वर्ग 3
2) हमजेखान महेमुदखान पठाण , वय 39, धंदा – मुकादम, रा सैय्यद मोहल्ला मारवाडी गल्लीच्या मागे , एरंडोल ( खाजगी इसम)
*लाचेची मागणी- प्रथम 7000 / -रुपये व तडजोडी अंती 5000 रू
*लाच स्विकारली- 5,000/-
*हस्तगत रक्कम- 5000/-
*लाचेची मागणी – दि.13/11/2024
*लाच स्विकारली – दि.13/11/2024
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांना शासकीय गोदाम मधून बारदान (रिकाम्या गोण्या) विकत घेण्याचे कंत्राट जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडून मिळाले आहे. आलोसे 1 हे शासकीय धान्य गोदाम, एरंडोल चे गोडावून कीपर आहेत व आलोसे 2 हे कंत्राटदार मुकादम आहेत. तक्रारदार यांनी त्यांना कंत्राट प्रमाणे नेमून दिलेले बारदान गोडावून मधून उचल्यानंतर आलोसे 1 व 2 यांनी 700 अतिरिक्त बारदान त्यांना इच्छा नसताना दिले व त्या बदल्यात 7000 ची मागणी केली. असे न केल्यास तुझा कंत्राट रद्द करू व भविष्यात कंत्राट मिळू देणार नाहीत असं सांगितले. म्हणून तक्रारदार यांनी समक्ष तक्रार दिली.
पडताळणी कारवाई दरम्यान दोन्ही आरोपीनी अतिरिक्त दिलेल्या बारदान च्या मोबदल्यात प्रथम 7000, 6000, 5550 ची मागणी करून तडजोड अंती 5000 रुपयाची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. आज दिनांक 13/11/2024 रोजी यातील आरोपी क्रमांक 2 मुकादम यास 5000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रांगेहाथ पकडण्यात आले आहे. दोन्ही आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेवर एरंडोल पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
- सापळा परिवेक्षण अधिकारी – योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि जळगांव
- सापळा व तपास अधिकारी – श्रीमती स्मिता नवघरे,पोलीस निरीक्षक,लाप्रवि जळगांव
- सापळा पथक – PSI/दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोकॉ/राकेश दुसाने