नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रतिबंधक कारवाईत मदत व त्यामध्ये त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात ४ हजाराची लाचेची मागणी चाळीसगाव येथील पोलिस हवालदार जयेश पवार यांनी केली. त्यानंतर या लाचेचा पहिला हप्ता दोन हजार खासगी इसम सुनील श्रावण पवार यांनी घेतला. यावेळी एसीबीने कारवाई करत गुन्हा दाखल केला.
या घटनेबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचेवर चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन दाखल झालेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांचेवर सदर दाखल गुन्हयाच्या अनुषगांने केलेल्या प्रतिबंधक कारवाईत मदत केल्याच्या मोबदल्यात व त्यामध्ये त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती ४ हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेच्या रक्कमेपैकी दोन हजार रुपये आरोपी खाजगी इसम सुनील पवार यांचे हस्ते स्वीकारली म्हणून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध चाळीसगाव शहर पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – ला.प्र.वि. धुळे.
तक्रारदार- पुरुष,45 वर्ष.
आरोपी-1) जयेश रामराव पवार वय- 50 वर्ष, (पो.हवा.बं.नं.205) नेमणूक-चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे.रा.गायके नगर ,हिरापूर रोड चाळीसगाव, जि.जळगाव.
2) सुनील श्रावण पवार, वय.52 वर्ष (खाजगी इसम ) रा. न्हावे ता.चाळीसगाव, जि.जळगाव
*लाचेची मागणी- दिनांक 12.11.2024 रोजी 4,000/- रु.
*लाच स्वीकारली – दिनांक 12.11.2024 रोजी तडजोडीअंती पहिला हप्ता 2,000/- रु.
*लाचेचे कारण* – यातील तक्रारदार यांचेवर चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे.येथे दि.5.9.2024 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांचेवर सदर दाखल गुन्हयाच्या अनुषगांने केलेल्या प्रतिबंधक कारवाईत मदत केल्याच्या मोबदल्यात व त्यामध्ये त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात आलोसे क्र1) यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 4,000/-रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेच्या रक्कमेपैकी 2,000/-रुपये आरोपी खाजगी इसम क्र.2) यांचे हस्ते स्वीकारली म्हणून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध चाळीसगाव शहर पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी– *मा. पोलीस अधीक्षक,जळगाव.
- परिवेक्षण तथा तपासी अधिकारी- सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
सापळा पथक– पो.हवा. राजन कदम, पो.हवा. पावरा, सुधीर मोरे ,पो.शि.रामदास बारेला सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट* .
*मार्गदर्शक –
*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर*
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र, नाशिक
मो.न. 9371957391