नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोल वरून विज कनेक्शन सुरु करण्यासाठी महावितरणचे जळगाव येथील शिरसोली युनिटचे वरिष्ठ तंत्रज्ञ ( वायरमन) विक्रांत अनिल पाटील,उर्फ देसले हे ३० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या घटनेत १० हजाराची लाच अगोदर स्विकारल्यामुळे २० हजाराची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे घराचे बांधकाम साईटचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर ठिकाणी नवीन पोल टाकण्यात आले होते. सदर पोल वरून विज कनेक्शन सुरु करण्यासाठी तक्रारदार हे महावितरण कार्यालय शिरसोली येथे वेळोवेळी गेले होते. त्यावेळ देसले यांनी सदरचे काम करून देण्याचे मोबदल्यात ३० हजार रुपयेची लाचेची मागणी केली होती. ३० हजार रुपयापैकी १० हजार रुपये या अगोदर घेतले होते. तरीपण विज कनेक्शन चालु करून देत नव्हते ते विज कनेक्शन चालू करून देण्यासाठी उर्वरीत ठरलेले २० हजार रुपयांची लाचेची मागणी करीत होते. त्याबाबत तक्रारदार यांनी लाप्रवि जळगांव येथे १८ ऑक्टोंबर रोजी तक्रार दिली होती. सदर तक्रारी प्रमाणे पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी केली असता यातीत देसले यांनी दोन नवीन पोल टाकले व वीज जोडणी चालू करण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी १० हजार रुपये या पूर्वी स्वीकारले होते. तरी देखील तक्रारदार यांचेशी संबंधित वीज जोडणी लाचेची उर्वरित रक्कम दिली नाही म्हणून करू दिली नाही. सदरची वीज जोडणी सुरु करण्यासाठी व पोल टाकून दिले म्हणून आज ८ नोव्हेंबर रोजी आलोसे देसले यांना उर्वरित २० हजार रुपये लाच रककम घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
*तक्रारदार- पुरुष,वय-48 रा. संभाजी नगर ता. जि. जळगांव
आलोसे :- विक्रांत अनिल पाटील,उर्फ देसले , वय 38 वर्षे, व्यवसाय नोकरी, वरिष्ठ तंत्रज्ञ ( वायरमन) शिरसोली युनिट रा .मावली नगर जळगांव वर्ग 4
व इतर एक
*लाचेची मागणी- 30,000/ -रुपये
*लाच स्विकारली- 20,000/- (10,000 रुपये या पूर्वी स्विकारल्याचे मान्य केले आहे)
*हस्तगत रक्कम- 20,000/-
*लाचेची मागणी- दि.18/10/2024 , दि.22/10/2024
*लाच स्विकारली – दि.08/11/2024
*लाचेचे कारण- यातील तक्रारदार यांचे घराचे बांधकाम साईटचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर ठिकाणी नवीन पोल टाकण्यात आले होते. सदर पोल वरून विज कनेक्शन सुरु करन्यासाठी तक्रारदार हे महावितरण कार्यालय शिरसोली, जळगाव येथे वेळोवेळी गेले असता यातील आलोसे यांनी सदरचे काम करून देण्याचे मोबदल्यात 30 हजार रुपये ची लाचेची मागणी केली होती. व 30 हजार रुपयापैकी 10 हजार रुपये या अगोदर घेतले होते. तरीपण विज कनेक्शन चालु करून देत नव्हते ते विज कनेक्शन चालू करून देण्यासाठी उर्वरीत ठरलेले 20 हजार रुपयांची लाचेची मागणी करीत होते त्याबाबत तक्रारदार यांनी लाप्रवि जळगांव येथे दि.18/10/2024 रोजी तक्रार दिली होती.सदर तक्रारी प्रमाणे पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी केली असता यातीत आलोसे यांनी दोन नवीन पोल टाकले व वीज जोडणी चालू करण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 10,000 रुपये या पूर्वी स्वीकारले होते. तरी देखील तक्रारदार यांचेशी संबंधित वीज जोडणी लाचेची उर्वरित रक्कम दिली नाही म्हणून करू दिली नाही. सदरची वीज जोडणी सुरु करण्यासाठी व पोल टाकून दिले म्हणून आज दि.08/11/2024 रोजी आलोसे क्र.1 यांना उर्वरित 20000/- रुपये लाच रककम घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. म्हणून त्यांच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशन जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
सापळा व तपास अधिकारी – श्री. योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि जळगांव
*सापळा पथक – PSI/दिनेशसिंग पाटील,सुरेश पाटील,पोना किशोर महाजन,
पोकॉ/राकेश दुसाने