नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहा हजार रुपयाच्या लाच प्रकरणात व्दारका येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील लीपीक (निरीक्षक) सुमंत सुरेश पुराणीक, लघुलेखक संदीप मधुकर बावीस्कर हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचेकडे नविन दाखल फाईलच्या नेमलेल्या तारखा देणे, सुनावणी कामकाजात अडवणुक न करणे, निकाली फाईल नकला विभागाला विहीत वेळेत पाठविले बददल, व येणा-या पुढील सुनावणीचे कामकाजात अडथळा न आणता सदर कामकाज जलद गतीने करुन देणेचे मोबदल्यात सुमंत सुरेश पुराणीक यांनी पंच साक्षीदार यांचे समक्ष २३ सप्टेंबर रोजी लाचेची मागणी केली. त्यावेळेस पडताळणी कारवाई दरम्यान प्रथम २० हजार रुपये लाचेची शासकीय पंचांसमक्ष फिर्यादी/तक्रारदार यांचेकडे मागणी करुन, तडजोडी अंती १५ हजार रुपये लाचेची मागणी केली, सदर लाच मागणीस दीप मधुकर बावीस्कर यांनी प्रोत्साहन दिले असून सदरची लाच रक्कम आज १ ऑक्टोंबर रोजी सुमंत सुरेश पुराणीक यांनी त्यांचे शासकीय कार्यालयात पंच साक्षीदार यांचे समक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन मुंबईनाका, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
यशस्वी सापळा कारवाई’’
- ’युनिट -’ नाशिक
- ’तक्रारदार-’ पुरूष वय-43
- आलोसे- १) सुमंत सुरेश पुराणीक वय 40 वर्षे, व्यवसाय-नोकरी, पद-न्याय लिपीक (निरीक्षक), वर्ग-३, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, दवारका नाशिक, रा. श्री निधी बंगला, डी जी पी नगर-1, रेयॅान स्कुल जवळ, नाशिक पुणे रोड, नाशिक
२) संदीप मधुकर बावीस्कर वय ४७ वर्षे, व्यवसाय-नोकरी, पद-लघुलेखक, वर्ग-२(अराजपत्रीत) धर्म दाय उप-आयुक्त, नाशिक रा. एन ४२, जे.सी. २/२/५ रायगड चौक, सिडको नाशिक - ’लाचेची मागणी- १५०००/-
- ’लाच स्विकारली- १००००/-
- ’हस्तगत रक्कम- १००००/-
- ’लालेची मागणी – दि.२३/०९/२०२४
- ’लाच स्विकारली – दि. ०१/१०/२०२४
- तक्रार-तक्रारदार यांचेकडे नविन दाखल फाईलच्या नेमलेल्या तारखा देणे, सुनावणी कामकाजात अडवणुक न करणे, निकाली फाईल नकला विभागाला विहीत वेळेत पाठविले बददल, व येणा-या पुढील सुनावणीचे कामकाजात अडथळा न आणता सदर कामकाज जलद गतीने करुन देणेचे मोबदल्यात लोकसेवक श्री सुमंत सुरेश पुराणीक यांनी पंच साक्षीदार यांचे समक्ष दिनांक 23/09/2024 रोजी लाच पडताळणी कारवाई दरम्यान प्रथम 20,000/- रुपये लाचेची शासकीय पंचांसमक्ष फिर्यादी/तक्रारदार यांचेकडे मागणी करुन, तडजोडी अंती 15000/- रुपये लाचेची मागणी केली, सदर लाच मागणीस आलोसे क्र. २ यांनी प्रोत्साहन दीले असुन, सदरची लाच रक्कम आज दिनांक 01/10/2024 रोजी आलोसे क्र.१ यांनी त्यांचे शासकीय कार्यालयात पंच साक्षीदार यांचे समक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन, त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन मुंबईनाका, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
- आलोसे यांचे सक्षम अधिकारी-मा. धर्मदाय आयुक्त, महाराश्ट्र राज्य, मुंबई, ससमीरा बिल्डींग, वरळी मुंबई – 18
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- ’सापळा अधिकारी -श्री.नितीन पाटील, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
- ’सापळा पथक’ – पोलीस नाईक विनोद चैधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे,