इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगाव जिल्हयातील पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील सरपंचासह एक खासगी व्यक्ती १० हजार रुपयाच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. गाव नमुना आठ अ मध्ये नावे ग्रामसेवक यांच्याकडून लावून देण्याच्या मोबदल्यात सरपंच अनिल विश्राम पाटील यांनी दहा हजार रुपयांची लाच मागणी केली. त्यानंतर ती खासगी व्यक्ती बलराम हेमराज भिल याला देण्यास सांगितली. त्याचवेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ या व्यक्तीला पकडले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी असून त्यांचे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. परंतु तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नसल्याने त्यांच्या नावावर गाव नमुना आठ अ मध्ये नावे लावण्यासाठी सदरचे काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच यांनी दहा हजार रुपयांची लाच मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी लाप्रवि जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने लाच मागणी पडताळणी केली असता सरपंच यांनी सदर काम करून देण्याचे बदल्यात १० हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम खासगी व्यक्ती यांच्याकडे देण्यास सांगितले. खासगी व्यक्ती यांना दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचेवर पाचोरा पोलीस स्टेशन, जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – जळगाव.
*तक्रारदार- पुरुष,वय-40 रा. खडकदेवळा ता.पाचोरा जि.जळगांव
*आलोसे क्र.1)अनिल विश्राम पाटील वय 46 वर्षे,व्यवसाय सरपंच खडकदेवळा बुद्रुक ता. पाचोरा
2) बलराम हेमराज भिल, वय 46 वर्षे खाजगी इसम रा. खडकदेवळा बु. ता. पाचोरा
*लाचेची मागणी- 10000/ रुपये
*लाच स्विकारली- 10000/- रुपये
*हस्तगत रक्कम- 10000/- रुपये
*लाचेची मागणी- दि.27/09/2024
*लाच स्विकारली – दि.27/09/2024
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी असून त्यांचे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते . परंतु तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नसल्याने त्यांच्या नावावर गाव नमुना आठ अ मध्ये नावे लावण्यासाठी सदरचे काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच यांनी दहा हजार रुपयांची लाच मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी लाप्रवि जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने लाच मागणी पडताळणी केली असता आलोसे क्र.1 यांनी सदर काम करून देण्याचे बदल्यात 10000/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम आलोसे क्रं .2 यांच्याकडे देण्यास सांगितले. आलोसे क्र.2 यांना दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पाचोरा पोलीस स्टेशन, जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
- सापळा पर्यवेक्षक अधिकारी- योगेश ठाकूर पोलीस, उपअधीक्षक लाप्रवि जळगांव
- सापळा व तपास अधिकारी- स्मिता नवघरे पोलीस निरीक्षक लाप्रवि जळगांव
- सापळा पथक – Psi दिनेशसिंग पाटील, पोकॉ राकेश दुसाने
- कारवाई मदत पथक- नैत्रा जाधव, पोलीस निरीक्षक, पोहेकॉ,रविंद्र घुगे,सुनिल वानखेडे शैला धनगर, पोना किशोर महाजन , बाळू मराठे , पोकॉ ,प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी