नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अपिल आदेशाच्या निकालाची प्रत देण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयातील विभागीय तांत्रिक अधिकारी राजेंद्र भागवत केदारे हे १० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे भावाचे पत्नी ह्या महिला बचत गटाच्या अध्यक्ष असून त्यांना जिल्हा पुरवठा विभाग नाशिक यांचे मार्फतीने स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. त्यावर विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे अपील सुरू होते. सदर अपिलाचा निकाल हा तक्रारदार यांच्या वहीनीच्या बचत गटाच्या बाजूने लागल्याने सदर अपिल आदेशाच्या निकालाची प्रत देण्याकरिता राजेंद्र भागवत केदारे यांनी दिनाक २४ सप्टेंबर रोजी १५ हजार रुपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी करून तडजोडी अंती १० हजार रुपये पंच साक्षीदारांचा समक्ष स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
यशस्वी सापळा कारवाई**
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरूष वय- 39
*आलोसे- राजेंद्र भागवत केदारे, वय-57,
पद -विभागीय तांत्रिक अधिकारी (वर्ग -2),विभागीय आयुक्त कार्यालय,नाशिक उपविभाग,नाशिक.
*लाचेची मागणी- 15000/-
*लाच स्विकारली- 10000/-
*हस्तगत रक्कम- 10000/-
- लाचेची मागणी – दि.24/09/24
*लाच स्विकारली – दि.24/09/2024
*तक्रार:– यातील तक्रारदार यांचे भावाचे पत्नी ह्या महिला बचत गटाच्या अध्यक्ष असून त्यांना जिल्हा पुरवठा विभाग नाशिक यांचे मार्फतीने स्वस्त धान्य दुकान मंजूर झाले आहे. त्यावर विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे अपील सुरू होते. सदर अपिलाचा निकाल हा तक्रारदार यांच्या वहीनीच्या बचत गटाच्या बाजूने लागल्याने सदर अपिल आदेशाच्या निकालाची प्रत देण्याकरिता आरोपी लोकसेवक यांनी दिनाक 24/9/2024 रोजी 15000/- रुपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10000/- रुपये पंच साक्षीदारांचा समक्ष स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी- प्रधान सचिव , अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,मंत्रालय 32,मुंबई .
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा अधिकारी – राजेंद्र सानप, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
*सापळा पथक*
पो. हवा.प्रफुल्ल माळी
पो.ना.विलास निकम
चालकपो.हवा.संतोष गांगुर्डे