नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रवासी व मालवाहतूक गाडीवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी घोटी पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक विक्रांत झाल्टे हे ५०० रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याविरुद्ध घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची पिकअप गाडी असून त्याद्वारे ते घोटी हद्दीत प्रवासी वाहतूक व माल वाहतूक करतात. सदर गाडी प्रवासी व मालवाहतूक करून पट्ट्यावर चालू देण्यासाठी व सदर गाडीवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी यातील पोलिस नाईक विक्रांत झाल्टे यांनी पाचशे रुपयाची लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरूष वय- 34
*आलोसे- विक्रांत चंद्रकांत झाल्टे वय-39, पोलीस नाईक घोटी पोलीस स्टेशन ता. इगतपुरी जिल्हा नाशिक
*लाचेची मागणी- ५००/-
*लाच स्विकारली- ५००/-
*हस्तगत रक्कम- ५००/-
- लाचेची मागणी – दि.21/03/2024
*लाच स्विकारली – दि.24/03/2024
तक्रार:- यातील तक्रारदार यांची पिकअप गाडी असून त्याद्वारे ते घोटी हद्दीत प्रवासी वाहतूक व माल वाहतूक करतात सदर गाडी प्रवासी व मालवाहतूक करून पट्ट्यावर चालू देण्यासाठी व सदर गाडीवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक यांनी पाचशे रुपयाची पंचा समक्ष लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्याविरुद्ध घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
- आलोसे यांचे सक्षम अधिकारी-मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- सापळा अधिकारी – श्रीमती मीरा वसंतराव आदमाने, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
- सापळा पथक – पो. हवा.पंकज पळशीकर, पो.हवा.प्रमोद चव्हाणके, पो.हवा दीपक पवार, चालक पो.हवा. विनोद पवार