नाशिक – आठ लाख रुपयाची लाच प्रकरणात जिल्हा परिषदेच्या वादग्रस्त लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर- झनकर अखेर फरार झाल्या आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल त्यांच्यासह दोन जणांवर लाच प्रकरणी कारवाई केली होती. पण, महिला असल्याने सुर्यास्तानंतर अटत करता येत नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समन्स बजावत वैशाली वीर यांना दिराच्या ताब्यात दिले होते. सकाळी आठ वाजता त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते, पण त्या हजर राहिल्या नाही. मात्र दुपारी अडीच वाजेपर्यंत न्यायालयात वैशाली वीर हजर न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या फरार झाल्याचे न्यायालयात सांगितले.या प्रकरणातील वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते या दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आज पहाटेच्या सुमारास भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान वैशाली वीर या अटकपूर्व जामीन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात गेल्याचे बोलले जात आहे.
मंगळवारी असा रचला होता सापळा
▶️ युनिट – ठाणे
▶️ *तक्रारदार- पुरुष वय ४५वर्षे
▶️ आरोपी- १) श्रीमती वैशाली पंकज विर, वय -४४ वर्षे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, नाशिक.
२)ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले.शासकीय वाहक चालक.
३) पंकज रमेश दशपुते,प्राथमिक शिक्षक जि. प. शाळा राजेवाडी त.नाशिक.
▶️ *लाचेची मागणी-* ९,००,०००/- रुपये
▶️ *लाच स्विकारली* तडजोड अंती रु.८,००,०००/-
▶️ *हस्तगत रक्कम-* ८,००,०००/-रुपये.
▶️ *लाचेची मागणी -* ता.०६/०७/२०२१, २७/०७/२०२१
▶️ *लाच स्विकारली -*
दि.१०/०८/२०२१ रोजी १७:३० वा.
▶️ *लाचेचे कारण*
यातील तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबत चा कार्या देश काढून देण्याकरिता आरोपी क्र.३) यांनी आरोपी क्र.१) यांचे करिता ९,००,०००/- ₹ मागणी केली त्यांनंतर दिनांक २७/०७/२०२१ रोजी आलोसे क्रमांक 1 यांची पडताळणी केली असता त्यांनी सादर कामाकरिता तडजोडी अंती 8,00,000 स्वीकारल्याचे मान्य करून लाचेच पुढील व्यवहार त्यांचे चालक आरोपी क्रमांक 2 यांचे सोबत करण्या बाबत सांगितले त्यांनंतर दिनांक 10/8/21 रोजी आलोसे क्रमांक 2 यांनी आलोसे क्रमांक 1 यांचे करीत तक्रारदार यांचे कडून 8,00,000 रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले
▶️ *सापळा अधिकारी-* श्रीमती पल्लवी ढगे पाटील ए. सी. बी. ठाणे
▶️ सह सापळा अधिकारी पो नि मते
▶️ *सापळा पथक*
पोहवा/ मोरे ,लोटेकर पोना/ शिंदे , अश्विनी राजपूत पो शी/ सुतार चापोहवा/शिंदे
▶️ *मार्गदर्शन अधिकारी – *मा. डॉ. श्री.पंजाबराव उगले सो. पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र*
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी*
अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई
———————-
अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे
दूरध्वनी क्र 27833344