नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हॅाटेलसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ७५ हजाराची लाचेची मागणी करणा-या सिन्नर तालुक्यातली गोंदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. लाच मागण्याच्या प्रकरणात माजी सरपंच अनिल दौलत तांबे यांच्या विरुध्द सिन्नर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे हॉटेल आदित्य या नावाने परमिट रूम व बियरबार व्यवसाय सुरु करावयाचा असल्याने गोंदे ग्रामपंचायतीची ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी गोंदेचे ग्रामपंचायत कार्यालय येथे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे बाबत अर्ज केला होता. सदर ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी गोंदेचे तत्कालीन सरपंच आलोसे अनिल दौलत तांबे यांनी स्वतःसाठी व ग्रामसेवक भणगीर यांचे नवाने ७५ हजार रुपयाची मागणी करून भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी पैशांच्या स्वरूपात लाभ मिळविण्यासाठी व्यवस्था करून लाचेची मागणी केली. त्यामुळे अनिल दौलत तांबे, माजी सरपंच, गोंदे ता. सिन्नर यांचे विरुद्ध आज २१/०९/२०२४ रोजी पोलीस स्टेशन सिन्नर येथे गु.र.नं. ६९०/२०२४ भ्र.प्र.अधिनियम १९८८ चे कलम ७ व ७(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच मागणी कारवाई*
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरूष वय-२१
आलोसे-श्री अनिल दौलत तांबे, वय-३६, माजी सरपंच गोंदे ता. सिन्नर रा. गोंदे ता. सिन्नर जिल्हा नाशिक
*लाचेची मागणी- ७५०००/-
*लाच स्विकारली- निरंक
*हस्तगत रक्कम- निरंक
*लालेची मागणी – दि.०१/०३/२०२४
*लाच स्विकारली – निरंक
तक्रार:-तक्रारदार यांनी गोंदे ता. सिन्नर जिल्हा नाशिक येथे हॉटेल आदित्य या नावाने परमिट रूम व बियरबार व्यवसाय सुरु करावयाचा असल्याने गोंदे ग्रामपंचायतीची ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी गोंदे चे ग्रामपंचायत कार्यालय येथे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे बाबत अर्ज केला होता . सदर ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी गोंदे चे तत्कालीन सरपंच आलोसे अनिल दौलत तांबे यांनी स्वतःसाठी व ग्रामसेवक श्री भणगीर यांचे नवाने ७५०००/- रू ची मागणी करून भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी पैशांच्या स्वरूपात लाभ मिळविण्यासाठी व्यवस्था करून लाचेची मागणी केली म्हणून आलोसे श्री अनिल दौलत तांबे, माजी सरपंच, गोंदे ता. सिन्नर यांचे विरुद्ध आज दिनांक २१/०९/२०२४ रोजी पोलीस स्टेशन सिन्नर येथे गु.र.नं. ६९०/२०२४ भ्र.प्र.अधिनियम १९८८ चे कलम ७ व ७(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी-मा. मुख्याधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा अधिकारी -श्री.नितीन पाटील, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
*सापळा पथक -पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे,
पो.हवा. सुनील पवार