नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात २० हजाराची लाच मागणा-या सातपूर पोलिस ठाणे येथील पोलिस शिपाई अनंत बळवंतराव महाले यांच्या विरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे भंगार दुकान हे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असून यातील पोलिस शिपाई महाले यांनी तक्रारदार यांचा भावाला त्यांचे भंगार दुकानातून काही कारण न सांगता चौकशी साठी सातपूर पो. ठाणे येथे घेऊन गेले. त्यानंतर तक्रारदार यांना फोन करून तुला व तुझ्या भावाला एखाद्या गुन्ह्यात अटक करून टाकू, जर तुला तुमचावर गुन्हा दाखल करून घ्यायचा नसेल तुम्ही आम्हाला २५ हजार रुपयाची द्यावे लागतील अशी मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी ला.प्र.वि. नाशिक कार्यालय येथे तक्रार दिल्यानंतर पडताळणी कारवाईमध्ये पोलिस शिपाई यांनी पंच समक्ष २५ हजारा ची मागणी करून तडजोडी अंती २० हजार रुपयाची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले आहे. त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
*लाचेची मागणी कारवाई
*युनिट – नाशिक
*तक्रारदार- पुरुष, वय- 27 वर्ष.
*आरोपी लोकसेवक – अनंता बळवंतराव महाले. वय 38 वर्ष पो. शि 2103, सातपूर पोलिस ठाणे, नाशिक.
*लाचेची मागणी*- तडजोडी अंती 20,000/-
*लाचेची मागणी – दि. 7/04/2024
तक्रार:- यातील तक्रारदार यांचा भंगारचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांचे भंगार दुकान हे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असून यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचा भावाला त्यांचे भंगार दुकानातून काही कारण न सांगता चौकशी साठी सातपूर पो. ठाणे येथे घेऊन गेले व तक्रारदार यांना फोन करून तुला व तुझ्या भावाला एखाद्या गुन्ह्यात अटक करून टाकू, जर तुला तुमचावर गुन्हा दाखल करून घ्यायचा नसेल तुम्ही आम्हाला 25,000/- रुपयाची द्यावे लागतील अशी मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी ला.प्र.वि. नाशिक कार्यालय येथे तक्रार दिल्यानंतर पडताळणी कारवाई मध्ये आलोसे यांनी पंच समक्ष 25000/- ची मागणी करून तडजोडी अंती 20,000/- रुपयाची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले आहे. त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा व तपास अधिकारी – निलिमा सविता केशव डोळस, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक
*सापळा पथक – पो. ह .संदीप वणवे, पो. ना/ संदीप हांडगे, पो. शि/ सुरेश चव्हाण