नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – थकीत वेतन अदा करण्यासाठी धुळे येथील माध्यमिक कार्यालयातील अधीक्षक मीनाक्षी भाऊराव गिरी या दोन लाखाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या. या लाच प्रकरणी धुळे शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार व त्यांची पत्नी हे महानगरपालिका हायस्कूल धुळे येथे विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहे. त्यांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा ३ व ४ हप्ता महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये मंजूर झालेला असून सदरचे थकीत वेतन तक्रारदार व त्यांची पत्नी यांना अदा करण्यासाठी अधीक्षक गिरी यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयाची लाचेची मागणी करून त्यांचे कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध धुळे शहर पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – ला.प्र.वि. धुळे
तक्रारदार- पुरुष, 48 वर्ष.
आरोपी– मीनाक्षी भाऊराव गिरी, वय-41 वर्ष, नोकरी- अधीक्षक, शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय, धुळे.
अतिरिक्त कार्यभार-
अधीक्षक ,वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय, धुळे. ( वर्ग २), रा. – अभियंता कॉलनी, वाडी भोकर रोड, गणपती मंदिराजवळ, धुळे मुळ रा. मु. पो. लोणी, ता. आर्णी, जि. यवतमाळ.
*लाचेची मागणी- दिनांक 20/08/2024 रोजी 2,00,000/- रु.
*लाच स्वीकारली – दिनांक 20/08/2024 रोजी 2,00,000/- रु.
*लाचेचे कारण – तक्रारदार व त्यांची पत्नी हे महानगरपालिका हायस्कूल धुळे येथे विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहे. त्यांचे एप्रिल 2022 ते ऑक्टोंबर 2023 या कालावधीतील थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा 3 व 4 हप्ता महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये मंजूर झालेला असून सदरचे थकीत वेतन तक्रारदार व त्यांची पत्नी यांना अदा करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे 2,00,000/- रू लाचेची मागणी करून त्यांचे कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध धुळे शहर पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी– मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण क्रीडा विभाग, मुंबई 32
सापळा परिवेक्षण अधिकारी-
श्री. सचिन साळुंखे
पोलीस उपअधिक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
मो.न.940374715*, *9834202955*
सापळा तपासी अधिकारी-
रूपाली खांडवी,
पो. निरी.,ला.प्र. विभाग, धुळे*
मो.नं. 8379961020.
सापळा पथक–
पो.हवा.राजन कदम, पो. कॉ. प्रशांत बागुल, पो. कॉ. प्रवीण पाटील सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे .