नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इरकॅान सोमा टोल वे प्रा. लि. नवी दिल्लीचे संचालक प्रदिप कटीयार यांच्या सांगण्यावरुन सदर कंपनीचे अकाऊंटींग व फायनान्स अधिकारी हरिश सत्यवली यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वत: करिता व प्रदिप कटीयार यांचेकरिता सात लाख रुपयाची लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम पंचा समक्ष स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिली आहे. या कारवाईची संपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे.