नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा सामान्य रुग्णालयातील वरीष्ठ लिपीक राजेश सुधाकर नेहुलकर हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकले आहे. २४ हजार रुपयाची लाचेची मागणी केल्यामुळे त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहुलकर यांनी १० ऑगस्ट २०२२ रोजी तक्रारदार् यांच्या पत्नीचे आजारपणाचे दोन वैद्यकीय बिल पुढील कार्यवाही साठी पाठविण्याचे मोबदल्यात दोन बिलांचे एकूण रकमेच्या ५ टक्के प्रमाणे ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर पंच साक्षीदार यांचे समक्ष तडजोडी अंती ४ टक्के प्रमाणे २४ हजार रुपयांची मागणी करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही आहे लाच मागणी कारवाई
– युनिट – नाशिक.
– तक्रारदार- पुरुष, वय -44 वर्ष,
– आलोसे-*
श्री.राजेश सुधाकर नेहुलकर
वय 55 ,व्यवसाय- नौकरी, वरिष्ठ लिपिक, जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक
– लाचेची मागणी-* 24,000/-₹
– *लाचेची मागणी तारीख* -10/08/2022
– लाचेचे कारण -*.
यातील आलोसे यांनी दिनांक 10/08/2022 रोजी तक्रारदार् यांचे पत्नीचे आजारपणाचे दोन वैद्यकीय बिल पुढील कार्यवाही साठी पाठविण्याचे मोबदल्यात दोन बिलांचे एकूण रकमेच्या 5 टक्के प्रमाणे 30,000/- रुपयांची पंच साक्षीदार यांचे समक्ष मागणी करून तडजोडी अंती 04 टक्के प्रमाणे 24,000/- रुपयांची मागणी करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून गुन्हा. – हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
– *सापळा अधिकारी*-
* संदीप साळुंखे ,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.,नाशिक.
– *सापळा पथक – पोह/पंकज पळशीकर, पोना/प्रभाकर गवळी, पोना/नितीन कराड, पोना/ प्रवीण महाजन, चापोह/संतोष गांगुर्डे,सर्व नेमणूक- लाप्रवि, नाशिक.
– *मार्गदर्शक-1) मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
2) मा.श्री.नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
३) मा.श्री.सतीश भामरे सो,
पोलीस उपअधीक्षक, वाचक, लाप्रवि, नाशिक.
– *आलोसे सक्षम अधिकारी- मा. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालाय, नाशिक ग्रामीण