नाशिक – जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या शाखा अभियंताला दीड लाख रुपयाची लाच कार्यालयात स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अमोल खंडेराव घुगे (४३) हे लाच घेणा-या अभियंत्याचे नाव आहे. ही कारवाई नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे नळ पाणी पुरवठ्याचे काम नियमानुसार ठेकेदाराने पूर्ण केले. सदर कामाचे ४८ लाख बिल तयार करून ते मंजूर करून दिल्याचे मोबदल्यात अभियंत्याने ४ टक्के प्रमाणे १ लाख ९० हजाराची लाच मागितली. पण तडजोडीअंती ३ टक्के प्रमाणे दीड लाखाची लाचेची रक्कम त्यांचे कार्यालयात स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या सापळ्याची सविस्तर माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.
*यशस्वी सापळा*
▶️ *युनिट -* नाशिक.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-46.
▶️ *आलोसे-*
* श्री. अमोल खंडेराव घुगे, वय-43 वर्षे, व्यवसाय नोकरी- शाखा अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग (राजपत्रित,गट- ब) नेमणूक – जिल्हा परिषद, नाशिक. रा.अशोका मार्ग, नाशिक.
▶️ *लाचेची मागणी-* 1,90,000/-रू.
▶️ *तडजोडी अंती लाचेची रक्कम* – 1,50,000/- रू.
▶️ *लाच स्विकारली-* 1,50,000/-रू.
▶️ *हस्तगत रक्कम-* 1,50,000/-रू.
▶️ *लाचेची मागणी -* दि.03/06/2022
▶️ *लाच स्विकारली-* दि.03/06/2022
▶️ *लाचेचे कारण -*.
तक्रारदार हे शासकीय स्थापत्य कंत्राटदार (ठेकेदार) असून त्यांनी मौजे पाथरे ता. सिन्नर जि. नाशिक येथे नळ पाणी पुरवठ्याचे काम नियमानुसार पूर्ण केले असून सदर कामाचे रू.48,00,000/- चे देयक(बिल) हे तयार करून ते मंजूर करून दिल्याचे मोबदल्यात आलोसे यांनी देयकाचे 4 टक्के रक्कम रू.1,90,000/- लाच म्हणून मागितली व तडजोडीअंती 3 टक्के प्रमाणे रू. 1,50,000/- लाचेची रक्कम त्यांचे कार्यालयात स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ *सापळा अधिकारी-*
श्री.अभिषेक पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.
▶️ *सापळा पथक -*
पो हवा सुकदेव मुरकुटे, पो ना मनोज पाटील, अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.
▶️ *मार्गदर्शक-*
*1)* मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*3)* मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*
मा. सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई.
—————————–
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
*अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
==================