नाशिक – आडगावच्या लाचखोर पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेक बाऊन्सचे प्रकरण मिटवून देण्यासाठी, तसेच तक्रारदार यांचे विरूद्ध व्याजाने पैसे दिले अशी खोटी तक्रार न नोंदविण्यासाठी २० हजाराची मागणी केल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. आडगाव पोलिस स्टेशनमधील राजेश हरी थेटे ( ५३) असे लाच मागणा-या हवालदाराचे नाव आहे. २५ एप्रिल रोजी तक्रारदाराकडून लाचेची मागणी करून रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.