त्र्यंबकेश्वर – गुन्ह्यात तपास कामात व आरोपीस जामीन मिळण्यास मदत करण्याकरता दहा हजाराची लाचेची मागणी करणा-या पोलिसाविरुध्द लाच लुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा दाखल केला आहे. मुकेश भिकचंद लोहार असे पोलिस शिपाईचे नाव आहे. तक्रारदार यांच्या भावंडा विरुद्ध त्रंबकेश्वर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोद झलाा आहे. सदर गुन्ह्यात तपास कामात मदत करणे तसेच आरोपी अटक आणि जामीन मिळण्यास मदत करण्याकरता मुकेश लोहार नेमणूक त्र्यंबकेश्वर पोलिस ठाणे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचा समक्ष दहा हजाराची ची मागणी केली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*यशस्वी सापळा*
▶️ *युनिट -* नाशिक.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-21, रा. वरसविहीर ता.त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक
▶️ *आलोसे-*
* श्री. मुकेश भिकचंद लोहार , वय-45वर्षे, व्यवसाय नोकरी – पो.शिपाई बक्कल नंबर 2932, नेमणूक – त्रंबाकेश्वर पोलिस ठाणे जि.नाशिक ▶️ *लाचेची मागणी- 10,000/-रू.
▶️ *लाचमागणी दिनांक- 16/12/2021
▶️ लाचेचे कारण –
तक्रारदार यांच्या भावंडं विरुद्ध त्रंबकेश्वर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोद असून दि.16/12/21 रोजी पंचा समक्ष नमूद गुन्ह्यात तपास कामात मदत करणे तसेच आरोपी अटक आणि जामीन मिळण्यास मदत करण्याकरता आलोसे मुकेश लोहार नेमणूक त्र्यंबकेश्वर पोलिस ठाणे यांनी तक्रारदार यांचेकडे पंच समक्ष रुपये 10000/- ची मागणी केली म्हणून गुन्हा.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ *सापळा अधिकारी-*
पो.नी भोये – बेलगावकर, अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.
▶️ *सहसापळा अधिकारी-*
श्री साळुंखे पोलिस निरीक्षक,अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.
▶️ *सापळा पथक -*
पो ह मोरे,पो.ना.प्रकाश महाजन, पो. हवा. पळशीकर, पो ना देशमुख, चालक जाधव,चालक गांगुर्डे अँटी करप्शन ब्युरो,नाशिक.