इगतपुरी – वैतरणा नगर येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नाशिक येथील आदेश काढून आणून देण्याच्या व सदर कालावधीचे वेतन काढून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदार लाचेची मागणी करुन ती स्विकारतांना मुख्याध्यापक मानीकलाल रोहिदास पाटील हे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती
*यशस्वी सापळा*
▶️ *युनिट -* नाशिक.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-34, रा. वैतरना नगर ता.इगतपुरी जि.नाशिक
▶️ *आलोसे-*
* श्री. मानीकलाल रोहिदास पाटील , वय-52 वर्षे, व्यवसाय नोकरी – मुख्याध्यापक, नेमणूक -शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वैतरणा नगर , ता.इगतपुरी जि.नाशिक
▶️ *लाचेची मागणी-* 10,000/-रू.
▶️ *लाच स्विकारली-* 10,000/-रू.
▶️ *हस्तगत रक्कम-* 10,000/-रू.
▶️ *लाचेची मागणी -* दि.11/03/2022
▶️ *लाच स्विकारली-* दि.15/03/2022
▶️ *लाचेचे कारण -*.
तक्रारदार हे 10 वर्षापासून कंत्राटी कामाठी म्हणून मानधनावर काम करित असुन दि.16/11/21 ते दि 11/01/22 पावतो आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नासिक येथील आदेश काढून आणून देण्याच्या व सदर कालावधीचे वेतन काढून दिल्याच्या मोबदल्यात
आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 10,000/-रुपये लाचेची मागणी करून 10,000/- रु लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले म्हणून गुन्हा.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ *सापळा अधिकारी-*
श्री.अनिल बागुल ,पोलीस निरीक्षक , अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.
▶️ *सापळा पथक -*
पो.ना.अजय गरुड, पो.ना.किरण आहिरराव , पो.ना.एकनाथ बाविस्कर ,पो. हवा. संतोष गांगुर्डे अँटी करप्शन ब्युरो,नाशिक.
▶️ *मार्गदर्शक-*
*1)* मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*3)* मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*
मा.अपर आयुक्त , आदिवासी विकास विभाग, नाशिक विभाग,नाशिक.