नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी व अटक वॉरंट कॅन्सल करण्याची मुदतवाढ देण्याचा मोबदल्यात दोन हजाराची लाच घेणा-या दोन सहाय्यक फौजदारासह एका खासगी इसम लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई ला प्र विभाग जळगांव यांनी केली.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, सदर तक्रारी प्रमाणे लाचमागणी पडताळणी केली असता यातील सहा फौजदार बाळकृष्णा पाटील व आत्माराम सुधाम भालेराव यांनी दोन हजाराची लाचेची मागणी केल्याची निष्पन्न झालेले आहे. त्यानंतर सापळा रचल्यानंतर खासगी इसम यांनी दोघांच्या सांगण्यावरुन ही लाच स्विकारली. या तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट -जळगांव
तक्रारदार- पुरुष,वय-47 वर्षे
आरोपीचे नावे
1) बाळकृष्ण मुकुंदा पाटील, वय- 55 वर्ष, व्यवसाय -नोकरी, सहा फौजदार खाते पोलीस विभाग (वर्ग 3)
2) आत्माराम सुधाम भालेराव, वय 57 व्यवसाय- नोकरी, सहा फौजदार दोन्ही नेमणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशन खाते पोलीस विभाग (वर्ग 3)
3) ठाणसिंग प्रतापसिंग जेठवे वय 42 वर्षे व्यवसाय मजुरी रा. शिपूर कन्हाळा ता. भुसावळ (खाजगी इसम)
लाचेची मागणी 5000/- रुपये
लाच स्विकारली रक्कम 2000/- रु
थोडक्यात हकिकत
यातील तक्रारदार यांचे विरुद्ध खामगांव कोर्ट जि बुलढाणा येथे कलम 138 प्रमाणे चेक बाऊन्स ची केस दाखल आहे. त्यानंतर तक्रारदार यांचे विरुद्ध कोर्टाने अटक वॉरंट काढले होते . सदर वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी व अटक वॉरंट कन्सल करण्याची मुदतवाढ देण्याचा मोबदल्यात यातील आलोसे 1 व 2 यांनी 5000/- रुपये लाचेची मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी दि . 21/08/2025 रोजी ला प्र विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती . सदर तक्रारी प्रमाणे लाचमागणी पडताळणी केली असता यातील आलोसे 1 व 2 यांनी पंचासमक्ष 2000/- रुपये लाचेची मागणी केल्याची निष्पन्न झालेले आहे . त्याप्रमाणे आज रोजी सापळा कारवाईचे आयोजन केले असता आलोसे क्रमांक 1 यांचे सांगणेवरून आरोपी क्रमांक 3 यांनी लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून यातील तीन ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आरोपी विरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी अटक करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
▶️ सक्षम अधिकारी
मा पोलीस अधिक्षक जळगांव
▶️ तपास व सापळा अधिकारी
श्री. योगेश ठाकूर
पोलिस उप अधीक्षक,
ला.प्र.वि. जळगांव.
▶️ सापळा पथक
श्री हेमंत नागरे पोलीस निरीक्षक
पोउपनिरी दिनेशसिंग पाटील
पोउपनिरी सुरेश पाटील चालक
पोहेकॉ किशोर महाजन
पोना बाळु मराठे
पोकॉ प्रदिप पोळ
पोकॉ/ भुषण पाटील
पो. कॉ/ प्रणेश ठाकूर