इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सामाजिक वनीकरण विभाग बांबु लागवडीच्या चार फाईली मंजुर करण्यासाठी ३६ हजाराच्या लाच प्रकरणात वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापूरे,
लिपीक निलेश मोतीलाल चांदणे, कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील हे एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या विरुध्द पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे शेतकरी असून त्यांना त्यांचे सडावण शिवारात तसेच त्यांचे ३ नातेवाईक अशांना शेतामध्ये बांबु लागवड करावयाची असल्याने तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांच्या शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष लागवड व फुलपिक लागवड योजनेचा लाभ मिळण्यासाठी ४ फाईल सामाजिक वनीकरण विभाग, अमळनेर यांचा अतिरिक्त कार्यभार पारोळा सामाजिक वनीकरण विभागाचे RFO मनोज कापुरे यांच्याकडे असल्याने २३ जुलै रोजी सामाजिक वनीकरण विभाग, पारोळा कार्यालयात जावुन RFO श्री कापुरे यांना भेटुन बांबु लागवड करावयाच्या वर नमुद व्यक्तींच्या नावे असलेल्या ४ फाईली मंजुर करण्यासाठी प्रत्येक फाईलचे १० हजार रुपये प्रमाणे एकूण ४० हजार रूपये दयावे लागतील, असे सांगितले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी ५ ऑगस्ट रोजी ला. प्र. विभाग, जळगांव येथे तक्रार दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – *जळगांव*
तक्रारदार- पुरुष, वय- 30 वर्षे.
आरोपीतांची नावे
1) मनोज बबनराव कापूरे, वय- 54 वर्ष, व्यवसाय – नोकरी, वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, पारोळा, अति. कार्यभार – सामाजिक वनीकरण, अमळनेर. (वर्ग – 2)
2) निलेश मोतीलाल चांदणे, वय 45 व्यवसाय- नोकरी, लिपीक वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, पारोळा. ( वर्ग 3)
3) कैलास भरत पाटील, वय 27 वर्षे, व्यवसाय, कंत्राटी कर्मचारी रा. मोरफळ ता. पारोळा ( कंत्राटी कर्मचारी)
तक्रारीचे स्वरूप–
यातील तक्रारदार हे शेतकरी असून त्यांना त्यांचे सडावण शिवारात तसेच त्यांचे ३ नातेवाईक अशांना शेतामध्ये बांबु लागवड करावयाची असल्याने तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांच्या शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष लागवड व फुलपिक लागवड योजनेचा लाभ मिळण्यासाठी ०४ फाईल सामाजिक वनीकरण विभाग, अमळनेर यांचा अतिरिक्त कार्यभार पारोळा सामाजिक वनीकरण विभागाचे RFO श्री कापुरे यांच्याकडे असल्याने दि.२३/०७/२०२५ रोजी सामाजिक वनीकरण विभाग, पारोळा कार्यालयात जावुन RFO श्री कापुरे यांना भेटुन बांबु लागवड करावयाच्या वर नमुद व्यक्तींच्या नावे असलेल्या ०४ फाईली मंजुर करण्यासाठी प्रत्येक फाईलचे १०,०००/- रू प्रमाणे एकूण ४०,०००/- रू दयावे लागतील, असे सांगितले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी दि. 05/08/2025 रोजी ला. प्र. विभाग, जळगांव येथे तक्रार दिली होती.
*पडताळणी कारवाई :-
सदर तक्रारीप्रमाणे लाचमागणी पडताळणी केली असता यातील आलोसे क्र.1 व 2 यांनी तक्रारदार व त्यांच्या वर नमूद नातेवाईकांच्या बांबू लागवड संदर्भात ०४ फाईली मंजूर करण्याकरिता प्रत्येक फाइलचे १०,०००/- असे एकूण ४०,००० ची मागणी करून ३५,०००/- रुपये स्वतःसाठी व १,०००/- रुपये आलोसे क्र. ०२ यांच्याकरिता अशी तडजोडीअंती ३६,०००/- रुपये पंचांसमक्ष लाचेची मागणी केली व सदरची रक्कम ही आरोपी क्र. ०३ कैलास भरत पाटील ( कंत्राटी कर्मचारी) याच्याकडे देण्याबाबत सांगितले.
*सापळा कारवाई :-
यातील आलोसे ०१ व ०२ यांनी मागणी केल्याप्रमाणे व त्यांनी सांगितले प्रमाणे दिनांक ०५/०८/२०२५ रोजी कैलास भरत पाटील यांनी पंचांसमक्ष लाच रक्कम स्विकारली. म्हणून आरोपी क्र. 1, 2 व 3 यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
*( यातील आलोसे क्रमांक १ यांनी स्वतः साठी ३५,००० व आलोसे क्रमांक २ याचेसाठी १००० ची मागणी केली आहे तर आलोसे क्रमांक २ यांनी आलोसे क्रमांक १ यांचेसाठी ४०,००० व तडजोड अंती ३५,००० व स्वतसाठी १००० ची मागणी केली आहे तर आलोसे क्रमांक ३ याने लाचेची रक्कम स्वीकारली आहे )*आरोपी विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी अटक करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.आरोपी यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे.
पर्यवेक्षण अधिकारी – श्री. योगेश ठाकूर, पोलिस उप अधिक्षक, ला. प्र. वि. जळगांव, मो. नं. 9702433131
*सापळा व तपास अधिकारी -श्री. हेमंत नागरे, पोलिस निरीक्षक , ला.प्र.वि. जळगांव.
*सापळा पथक– GPSI/ सुरेश पाटील (चालक), पोकाँ- भूषण पाटील. प्रणेश ठाकूर.