नाशिक : शेतजमीन मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात संशयीतांनी ५० हजाराच्या लाचेची मागणी करून ती स्विकारण्याची तयारी दर्शनवणा-या भूमि अभिलेख कार्यालयातील भुकरमापक आणि छाननी लिपीकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील ३६ वर्षीय तक्रारदाराने याबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने भूमि अभिलेख कार्यालयाकडे आपली शेतजमीन मोजणी करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. ही मोजणी तात्काळ व्हावी यासाठी गेल्या २२ ऑक्टोबर २०२१ रोजी तक्रारदारांने या कार्यालयात दोघांची भेट घेतली. यावेळी ५० हजार रूपयांची मागणी करण्यात आली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला होता. मात्र याबाबत संशयीतांना कुणकुण लागल्याने एसीबीचा सापळा अयशस्वी झाला होता. तांत्रीक विश्लेषणात लाच मागणे आणि स्विकारण्याची तयारी दर्शविण्याल्याचे समोर आल्याने तब्बल साडे तीन महिन्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.