नाशिक – नांदगाव येथील तहसिल कार्यालयातील लिपीक समाधान निंबा पवार व मध्यस्थ नितीन सोनवणे हे ५० हजार लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. या दोघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सांगितले की, नांदगाव शहरातील सर्वे नंबर ७६५ (नवीन गट नं ५) हे ८१ आर या क्षेत्रावर तक्रारदार यांचे आजोबाचे नाव लावणेकामी ५० हजाराच्या लाचेची मागणी केल्यामुळे तक्रारदाराने नाशिक कार्यालयात तक्रार केली होती. या तक्रारीवरुन सापळा रचण्यात आला. त्यानंतर लाचेची रक्कम ५० हजाराची समाधान पवार यांनी मागणी केली व सोनवणे यांनी लाचेची रक्कम पंचासमोर स्विकारल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.