मुंबई – देशभरात अनेक शहरांमध्ये धर्मांतरणाचे एक रॅकेट अलिकडेच सापडले. त्याचवेळी उत्तर प्रदेश आणि आसाम सारख्या राज्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत कठोर कायदे लागू करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यावरून विविध धर्मांमध्ये वादही निर्माण झाले आहेत. पण या संपूर्ण वातावरणात केरळमधील चर्चने मात्र ख्रिश्चन कुटुंबांना पाचपेक्षा जास्त अपत्य जन्माला घातली तर आर्थिक मदत करण्याची घोषणा करून नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.
पाच किंवा पाचपेक्षा जास्त अपत्य जन्माला घालणाऱ्या कुटुंबाला दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. २००० सालानंतर लग्न झालेल्या जोडप्यांन ही सुविधा मिळणार आहे. ख्रिश्चन समुदायाचे प्रस्थ भारतात वाढविणे हाच यामागचा उद्देश आहे. कोरोना महामारीमुळे संकटाचा सामना करणाऱ्या कुटुंबांना मदत करण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचा एक जावई शोधही लावण्यात आला आहे.
ईयर आफ दि फॅमिली सेलिब्रेशन या कार्यक्रमांतर्गत एक ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ही घोषणा करण्यात आली. ऑगस्टपासून ही मदत वितरीत केली जाणार आहे. केरळमध्ये ख्रिश्चन समुदायाची लोकसंख्या वेगाने कमी होत असल्यामुळे चर्चने ही घोषणा केली आहे. केरळमध्ये सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकावर असलेला ख्रिश्चन समुदाय आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. या समुदायाची लोकसंख्या १८.३८ टक्के आहे.
हेही महत्त्वाचे…
चौथ्या अपत्याच्या जन्माच्या वेळी संबंधित महिलेला चर्चमध्ये मोफत प्रसूतीची सुविधा मिळेल. त्याचवेळी या अपत्यावा मोठेपणी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशीही घोषणा चर्चने केली आहे.