विशेष प्रतिनिधी, नाशिक
कळवण तालुक्यातील अभोणा येथील पोलिस हवालदार बाजीराव केदू भामरे याने १५ हजार रुपयांची लाच घेतल्याने त्याच्या विरुद्ध अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात एसीबीने दिलेल्या माहितानुसार, वाळूचा भरलेला ट्रॅक्टर जप्त करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मदत करण्यासाठी आणि वाळूच्या ट्रकची नियमित वाहतूक करण्यासाठी बाजीराव भामरे याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. या सापळ्यात बाजीराव हा लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेला. त्यानंतर आता एसीबीने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा असून याप्रकरणी तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.