मुंबई – संसारामध्ये काही लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. तसेच संसार म्हटला की, पती-पत्नीची भांडणे ही सामान्य गोष्ट मानले जाते. परंतु एकमेकांची अनुरूप जोडी म्हणजेच त्याला हिंदीत त्यालाच ‘रब ने बना दी जोडी’ असे म्हणतात. बॉलीवूडमध्ये देखील अशाच अनेक फेमस जोड्या आहेत. त्यांचे लव्ह मॅरेज झाले असून त्यांच्याविषयी रसिकांना म्हणजेच सिनेमा प्रेक्षकांना बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय – बच्चन आणि अभिषेक बच्चन होय, ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात.
ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोघे एकमेकांसमोर असतात तेव्हा त्यांचे अतूट प्रेम व्यक्त करतात, सन २००७ मध्ये दोघांनी लग्न केले आणि त्यांना आराध्या नावाची मुलगी आहे. आता दोघांच्या लग्नाला १४ वर्षे झाली आहेत आणि दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यात कधीच वाद किंवा भांडणे पाहायला मिळाली नाही. दोघेही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वादात पडण्याचे टाळतात. पण अभिषेक बच्चन रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐश्वर्याची माफी मागतो. कारण आहे कारण हे वाचून किंवा ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल.
याबाबत ऐश्वर्या रायने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, प्रत्येक जोडप्याप्रमाणे त्यांच्यातही भांडणे होतात. दोघंही कोणत्याही विषयावर भांडतात, खरे तर, जेव्हा दोघांचे कोणत्याही एका गोष्टीवर एकमत होत नाही, तेव्हा काही वेळा असे घडते. मात्र आजपर्यंत दोघांमध्ये कोणतेही गंभीर भांडण झाले नसून काही ना काही थोडेफार वाद होतच असतात.
विशेष म्हणजे दोघांनी लग्नादरम्यानच एक नियम केला होता.
या नियमानुसार, जेव्हाही त्यांच्यात भांडण किंवा कोणत्याही प्रकारचा वाद होईल तेव्हा ते एकमेकांची माफी मागतील. तेव्हा अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘जर हे भांडण झाले नसते तर आमचे लग्न खूप कंटाळवाणे झाले असते. पण अनेकदा जेव्हा जेव्हा दोघांमध्ये टीप होते. अशा परिस्थितीत रोज रात्री झोपण्यापूर्वी अभिषेक बच्चन ऐश्वर्याची माफी मागतो. जेणेकरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली होऊ शकेल. यावर अभिषेकचे म्हणणे होते की, काही स्त्रिया आपली चूक मान्य करत नाहीत, त्यामुळे बहुतेक भांडणामध्ये त्या माफी मागत नाहीत.