नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संगीतकार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांचे, लंडन येथील प्रसिद्ध ऐतिहासिक ॲबे रोड स्टुडिओ येथे १०० ब्रिटिश सहकलाकार असलेल्या द रॉयल फिलहारमोनिक ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून भारताचे राष्ट्रगीत सादर केल्याबद्दल कौतुक केले आहे.
रिकी केजच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले; “अप्रतिम. यामुळे प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल.”
National Anthem at the legendary Abbey Road Studios, London