नाशिक – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नाशिक दौ-यावर असतांना पोलीस आयुक्त कार्यालयासमोर युवा स्वाभिमानी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी पिल्ले यांनी पतीसमवेत पेट्रोल अंगावर टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. मारहाणीबाबत पोलीस कोणतीही दखल घेत नसल्यामुळे त्यांनी निषेध म्हणून असे पाऊल उचलले. या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. श्रमित सेनेचे अजय बागुल यांच्याकडून मारहाण केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या मारहणीबाबत अंबड पोलीस स्टेशन व इंदिरा नगर पोलीस ठिकाणी तक्रार दिली. पण, येथे न्याय मिळाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.