मुंबई – ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या मागणीकरिता आज दिनांक ६ ऑक्टोबर रोजी दुपारी मंत्रालया समोर ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या आत्मदहनाबाबत घोडके म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू असला आणि त्याबाबतच्या अधिसूचनेवर राज्यपालांनी स्वाक्षरी केली असली तरी ओबीसी समाजास तातडीने न्याय मिळण्याची शक्यता धूसर असल्याने त्यांच्या न्याय हक्कासाठी मी मंत्रालयासमोर आत्मदहन करीत आहे. त्यांचा हा आत्मदहनाचा बघा व्हिडिओ