मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या अंकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मंत्रालयात बैठकीत हा प्रकाशन समारंभ झाला.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव (मावज) समृद्धी अनगोळकर, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, डॉ.गणेश मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘आपलं मंत्रालय‘ गृहपत्रिकेच्या अंकामध्ये मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या कथा, कविता, स्वानुभव तसेच पाककला, भ्रमंती या विषयीचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.
हा अंक https://online.publuu.com/855586/1875618/page/10 व https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:e5191597-43f9-409c-b53e-36c54d8b58c7 या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.








