रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आमीर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी चित्रपटाला का होतोय विरोध? हे आहे कारण…

by India Darpan
ऑगस्ट 3, 2022 | 3:18 pm
in मनोरंजन
0
Laal Singh Chaddha

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अशी ओळख असलेल्या आमीर खान याच्या चित्रपटांची प्रेक्षक अत्यंत आतुरतेने वाट पहात असतात. अत्यंत मोजकेच आणि निवडक चित्रपट करणाऱ्या आमीरवर चाहते म्हणूनच प्रेम करतात. सध्या मात्र आमिरचा नवीन ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

आमीर खान आणि करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रदर्शनाची जोरदार तयारी देखील सुरू आहे. मात्र, आता ट्विटरवर या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

#boycottlaalsinghchaddha या हॅशटॅगवर जवळपास ७० हजार ट्विट आहेत. लोक मुख्य कलाकार आमीर तसेच करीना यांना ट्रोल करत आहेत. यासाठी आमीर तसेच करीना यांच्या आजपर्यंतच्या अनेक वक्तव्यांचा आधार घेण्यात आला आहे. नेपोटिझमवरील वक्तव्यापासून आणि लोकांना नको असल्यास तिचे चित्रपट पाहू नयेत या करीनाच्या वक्तव्यापासून ते आमिर खानच्या चित्रपटांमधील वादग्रस्त दृश्ये “हिंदू धर्माच्या विरुद्ध” असतात, अशा अनेक गोष्टींचा त्याला आधार आहे.

“#LalSinghCaddha च्या महागड्या तिकिटांवर पैसे वाया घालवू नका. त्याऐवजी गरीब मुलाला खायला द्या. #BoycottLaalSinghCaddha (sic)” असे ट्विट रविवारी एका व्यक्तीने केले. “आप जाते हो ना फिल्म देखना तो मत जाओ. करीना के खान. ठीक है, हम लोग नही जायेंगे”, असे दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे.

आमीर खान याचा लालसिंग चड्ढा हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाद्वारे तेलुगू अभिनेता नागा चैतन्य बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट ऑक्टोबर २०१९ मध्ये तयार झाला आणि त्यानंतर कोरोनामुळे त्याच्या प्रदर्शनाला उशीर झाला. निर्मात्यांनी अखेर याच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केली आहे. आणि सध्या मोठ्या प्रमाणावर चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे.

Aamir Khan Movie Laal Singh Chaddha Controversy

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची ही आहे शिष्यवृत्ती योजना; आजच करा अर्ज

Next Post

येवल्यात महालक्ष्मी महिला ग्रुपतर्फे नागपंचमी सणानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

India Darpan

Next Post
IMG 20220803 WA0147 1 e1659521494804

येवल्यात महालक्ष्मी महिला ग्रुपतर्फे नागपंचमी सणानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011