मुंबई – निर्माता किरण राव यांच्याशी काडीमोड झाल्यानंतर अभिनेते आमीर खान याने अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्याशी लग्न केल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या आगामी लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमीर खान लग्नाची घोषणा करणार असल्याचा दावाही करण्यात येत आहे. परंतु फेसबुक पोस्टमध्ये आमीर आणि फातिमा यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले जात असून, दोघांनी विवाह केल्याचा दावा केला जात आहे.
व्हायरल पोस्ट कोणती?
फेसबुरवर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये आमीर आणि फातिमा यांच्या फोटोखालील ओळींमध्ये फातिमा शेख तीच अभिनेत्री आहे जिने दंगल चित्रपटात आमीर खानच्या मुलीची भूमिका केली होती. चित्रपटात फातिमाने गीता फोगटची भूमिका साकारली होती. आज आमीर खानची तिसरी बेगम झाली आहे. ही त्यांची खासगी बाब आहे. परंतु हे तेच आमीर खान आहेत जे सत्यमेव जयतेची जाहिरात करत होते. आता समाजातील बहुविवाहावर बोलतील का?
व्हायरल फोटोचे सत्य काय?
या दाव्यात किती तथ्य आहे हे दस्तुरखुद्द आमीर खानच सांगू शकतो. व्हायरल फोटोसोबत छेडछाड करण्यात आली आहे. खर्या फोटोमध्ये आमीर खान, किरण राव एकत्र उभे आहेत. कोणीतरी एडिटिंग करून किरण रावच्या जागी फातिमाचा चेहरा लावला आहे. हा फोटो आकाश अंबानी याच्या साखरपुड्यातील आहे. त्यावेळी आमीरचा किरण रावशी घटस्फोट झाला नव्हता.
या वर्षी झाला घटस्फोट
आमीर आणि किरण राव यांनी वेगळे होण्याची घोषणा करताना सांगितले होते, की आपल्या १५ वर्षांच्या सुंदर प्रवासात आम्ही एकसाथ जीवनभराचा अनुभव, आनंद घेतला आहे. आमचा संबंध विश्वास, सन्मान आणि प्रेमामुळे वाढला आहे. आता आम्हाला जीवनातील नवीन अध्याय सुरू करायचा आहे. आता पती-पत्नी नव्हे तर एकमेकांचे सहपालक आणि कुटुंब म्हणून सुरू करणार आहोत.