विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
आजच्या ताणतणावाच्या जीवनशैलीत रक्तदाब, हृदयरोग यासारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. हृदयरोग सारख्या आजारात आपल्याला आपल्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे घरातील स्वयंपाकघरात उपस्थित असलेले पारंपरिक पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असतात. त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आले किंवा आद्रक होय, आहारतज्ज्ञ यांच्या मते, आले हे रक्तदाब, जळजळ, कोलेस्टेरॉल, रोग प्रतिकारशक्ती, रक्ताच्या गुठळ्या मध्ये फायदेशीर आहे. तसेच एक उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट आहे. आले खालल्याचे काय फायदे होतात, ते बघू या…
– आल्यापासून बनवलेल्या कोणत्याही डिशचे सेवन केले तर खोकला, सर्दी किंवा कोणताही आजार होण्याची शक्यता खूपच कमी आहे. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात या डिशचे सेवन करणे आवश्यक आहे.
– काही गर्भवती महिलांना मळमळ आणि मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो. त्यामुळे आले जरुर खावे, कारण अद्रक आपल्याला चिंताच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करते.
– आल्याचे सेवन केल्याने शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचे प्रमाण कमी होते. हृदयाचे आरोग्यही खूप चांगले आहे. कोलेस्टेरॉलची पातळी आणि बीपी नियंत्रित करते, तसेच हृदयाचे आरोग्य खूप चांगले ठेवू शकते.
– आल्यामध्ये काही मधुमेह विरोधी गुणधर्म असून ते रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.त्यामुळे मधुमेहाचे रुग्ण देखील याचे सेवन करू शकतात.
– आले केवळ हवेतील संसर्ग व सर्दीपासून संरक्षण देत नाही, तर हृदयाचे आरोग्य देखील वाढवते.