पोलिस आयुक्तांनी घेतली तातडीने दखल; बहुतांश मागण्या केल्या तत्त्वतः मान्य
नाशिक- उद्योजक नंदकुमार आहेर यांच्या निर्घृण हत्येचा उद्योजक तसेच व्यापारी संघटनांनी आयमाच्या सभागृहात आयमाच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत तीव्र शब्दांत निषेध केला.मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन झाले पाहिजे यासाठी सह्यांची मोहीम राबविणे,या भागासाठी मंजूर असलेले पोलिस स्टेशन औद्योगिक वसाहतीतच midc पोलीस स्टेशन नावाने उभारावे,बंद पोलीस चौकी पुन्हा सुरू करावी, अतिरिक्त दोन पोलीस चौक्या चालू करणे,औद्योगिक तंटे सोडविण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अंबड लगतच्या विशिष्ट भागात पेट्रोलिंग वाढवणे व बीट मार्शल वाढवणे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना उद्योजकांच्या भावनांची तीव्र दखल घ्यावी लागली आणि त्यांनाही आयोजित बैठकीस हजेरी लावून उद्योजकांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांच्या बहुतांश मागण्या तत्वतः मान्य करण्याचे आश्वासन दिले.
व्यासपीठावर आयमा अध्यक्ष निखिल पांचाल, आयमाचे बीओटी चेअरमन धनंजय बेळे, चेंबरचे संजय सोनावणे ,एमेसएमईचे सदस्य प्रदीप पेशकार,नाईसचे उपाध्यक्ष रमेश वैश्य, लघुउद्योग भारतीचे सचिव निखिल तापडिया, निवेकचे माजी अध्यक्ष संदीप सोनार , उद्योग आघाडीचे अध्यक्ष सतीश कोठारी,सीसीआय चे माजी अध्यक्ष सुधीर मुतालिक,पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे,उपायुक्त विजय खरात,अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख,निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, डी.जी.जोशी, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे,खजिनदार राजेंद्र कोठावदे,माजी अध्यक्ष विवेक पाटील,डी.डी. गोपाळे,राजेंद्र अहिरे,सचिव योगिता आहेर,किरण शृंगारकर,लोकेश पिचाया,, लक्ष्मीकांत मूर्ती,लोकेश शेवडे, डी.जी जोशी, पी.बी.गुरदडी, योगेश जोशी, मिलींद देशपांडे, संजय महाजन, जयप्रकाश जोशी,सतीश खात्री, रवीन्द्र झोपे, गोविंद झा, विनायक मोरे आदिसहित मोठ्या संख्येने उद्योजक व मोठ्या कंपन्यांचे व्हाईस प्रेसिडेंट, एचआर हेड आदी होते.
सुरुवातीला नंदकुमार आहेर यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे स्तब्धता पाळल्यानंतर उपस्थित उद्योजकांनी आहेर यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला.आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करा, यासाठी उद्योजकांनी सामूहिकरित्या अर्ज करावेत, नाशकात गुंतवणूक यावी यासाठी औद्योगिक संघटना प्रयत्नशील असतांना अशा घटनांनी त्याला डाग लागत असेल तर ते योग्य नाही, उद्योजकांनी आपली एकजूट दाखवून द्यावी,या भागासाठी मंजूर असलेले पोलिस स्टेशन औद्योगिक वसाहतीत उभारावे, सिमेन्स ते घरकुल योजना या परिसरात होत असलेला टवाळखोरांचा उपद्रव थांबविण्यास पोलिसांनी पावले उचलावीत,
औद्योगिक तंटे सोडविण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा,औद्योगिक वसाहत परिसरात उच्च दर्जाची सीसीटीव्ही यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यान्वित करावी,मोकळे भूखंड म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा बनत असून त्याला पोलिसांनी पायबंद घालावा, औद्योगिक वसाहत परिसरात पेट्रोलिंग वाढवावी, मोठ्याप्रमाणात बीट मार्शल नेमावेत,बंद असलेली पोलिस चौकी पुन्हा सुरू करावी,उद्योग जगतात नाशिकची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी सर्वांनीच सामूहिकरित्या प्रयत्न करावेत, उद्योजकांनी नीतिमत्ता जोपासावी आदी सूचनां यावेळी आल्या .
बैठक सुरू असतांनाच पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख तेथे आले असता आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ आणि बीओटी चेअरमन धनंजय बेळे यांनी मंगळवारी घडलेल्या प्रकाराने उद्योजक प्रचंड दाहशतीखाली असून त्यांनी त्यांनी बैठकीत तीव्र संताप व्यक्त केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता पोलिस आयुक्तांनी बहुतांश मागण्या तत्त्वतः मान्य केल्या.औद्योगिक तंटे सोडविण्यासाठी एसीपी सोहेल शेख यांच्यावर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविणार, सातपूर आणि आंबडचे विभाजन करून नवीन जे पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.या ठाण्याला औधोगिक वसाहत असे नांव देण्याचा प्रयत्न करू,बंद पोलिस चौकी पुन्हा तातडीने सुरू करू,टवाळखोरांचा चोख बंदोबस्त करण्यात येईल,असे आश्वासन नाईकनवरे यांनी उद्योजकांना दिले.
बैठकीस समीर पटवा,अजय यादव,अमित शेट्टी, हेमंत पाटील,विरल ठक्कर, वैभव चावक,हेमंत खोंड,विराज गडकरी,महेश आहेर,उन्मेष कुलकर्णी,विशाल माहिमकर, अभिजित माहीमकर,भारत येवला, अविनाश मराठे,अमित आरोटे, डी.आर.चक्रवर्तीर्टी,रोहित प्रधान,सुमित दळवी,कुंदन डरंगे,जयंत पगार,राहुल गांगुर्डे, विजय बोडके,अविनाश बोडके,गणेश भागवत , गौरव धारकर,हर्षद ब्राह्मणकर, प्रकाश बारी आदी उपस्थित होते.