सिडको – आयामा रिक्रिएशन सेंटरला हवा गुणवत्ता सनियंत्रन केंद्राचे भूमिपूजन गुरूवारी आयामाचे अध्यक्ष वरून तलवार, एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी अमर दुरगुले, आयामा विश्वस्त समितीचे चेअरमन धनंजय बेळे, आयमचे सरचिटणीस ललित बुब यांच्या हस्ते कुदळ मारून व नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रादेशिक नियंत्रण मंडळाचे नाशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी अमर दुरगुले यांनी आयामा पदाधिकारी व उद्योजकांना हवा गुणवत्ता सनियंत्रन केंद्राबाबत माहिती दिली. वाढत्या शहरीकरणामुळे हवेचा स्तर दिवसेंदिवस खालावत असून त्याचे हे परीक्षण यंत्राच्या साहाय्याने २४ तास होणार आहे . नाशिकमध्ये ४ केंद्र होणार असून त्यापैकी आयामाचे एक असणार आहे. या प्रोजेकट चे काम इंनवीआ इंडिया प्रा ली. या कम्पनीतर्फे करण्यात येणार असल्याचे त्यांनी संगितले. यावेळी शांतीलाल नागरे (वैज्ञानिक अधिकारी), औचरमन (क्षेत्रीय अधिकारी), आयामांचे अविनाश मराठे, राजेंद्र कोठावदे, विरल ठक्कर, विजय जोशी, प्रकाश ब्राह्मणकर, विराज गडकरी, वैभव चावक, विलास लिधुरे उपस्थित होते .
चौकट
या हवा गुणवत्ता सनियंत्रनमुळे खालील घटक मोजण्याचे कार्य केले जाणार आहे. पीएम १०, पापीएम २.५, सिओ, एनओ, एनओ २, यनएच ३, ओझोन, वीओसी तसेच तापमान, आद्रता, सोलर रेडिएशन, हवेचा वेग, हवेची दिशा हा सर्व डेटा उपलब्ध होणार आहे. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारता येणार आहे. हा हवेचा डेटा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दिल्ली येथे त्यांच्या सर्व्हरवर पाठविण्यात येईल.हा डेटा आपल्याला वेब्साइटवर वर बघता येईल . यामुळे नागरिकांना व पर्यावरण प्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे .