इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. घरोघरीच्या गृहिणींचा या मालिकेतील अरुंधतीला चांगलाच पाठिंबा आहे. तिच्या प्रत्येक संघर्षात या प्रेक्षकांचे तिला पाठबळ होते. अरुंधतीच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाचे हे प्रेक्षक साक्षीदार आहेत. आशुतोषशी लग्न झाल्यानंतर आता तरी अरुंधतीच्या आयुष्यात सगळे सुरळीत होईल अशी अपेक्षा होती मात्र अनिरुद्ध काही अरुंधतीला त्रास देण्याचे सोडताना दिसत नाही.
नव्या प्रोमोने खळबळ
स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये वीणा ही आशुतोष आणि नितीनसोबत सकाळचा नाश्ता करत असते. तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो. वीणा ऑफीससाठी जागा शोधायची आहे, असे सांगते. मात्र, अनिरुद्ध वीणाला पुढचे काही महिने आपण आशुतोषच्या ऑफिसमधून काम करू असे म्हणतो. ते ऐकून वीणा खूश होते आणि आशुतोषकडे विनंती करते. आशुतोष देखील लगेच तयार होतो. नितीन मात्र, हे अरुंधतीला आवडणार नाही असे वाटून आशुतोषला अडवण्याचा प्रयत्न करतो. पण आशुतोष वीणाला होकार देतो. आता अरुंधतीला कळाल्यावर तिची प्रतिक्रिया काय असणार? अरुंधती ऑफिसला जाणे बंद करणार का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
वीणाच्या एन्ट्रीने त्रास वाढणार?
वीणाच्या एण्ट्रीने मालिकेच्या कथानकाने वेगळे वळण घेतले आहे. मालिकेत आशुतोषची बहिण वीणाची एण्ट्री होताच मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. वीणा आणि अनिरुद्ध हे एकत्र काम करत असतात. त्यामुळे मालिकेत आता रंजक वळण आले आहे
https://www.instagram.com/reel/CsvyVuVoPoK/?utm_source=ig_embed&ig_rid=c5bdd270-5174-49c4-a5ff-cf9a0d8e0fd7
Aai Kuthe Kai Karte Marathi TV Serial New Twist