इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही पकडले गेलेले नाहीत. त्या हल्ल्याच्या जखमा अजूनही भरून आलेल्या नाहीत. पण, केंद्र सरकारने २०२५ मध्ये भारतात होणाऱ्या हॉकी आशिया कपमध्ये पाकिस्तानला खेळण्यास मंजुरी दिली असल्याचे सांगत शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, यानंतर पुढची पायरी म्हणजे बीसीसीआयने क्रिकेट आशिया कपमध्ये भारत-पाक सामन्यांना मान्यता देणं. ह्यांना लाजही वाटत नाही का? हे खरंच जाहिरातीतून मिळणारा महसूल, टीआरपी यासारख्या गोष्टींच्या मोहापासून स्वतःला थांबवू शकत नाहीत का? – किमान जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादावर ठोस कारवाई होत नाही तोवर तरी?
केंद्र सरकार ठाम भूमिका घेऊन, जोवर पाकिस्तान दहशतवादावर ठाम उपाय करत नाही तोवर पाकिस्तानला अशा कोणत्याही कार्यक्रमातून लाभ होणार नाही, हे दाखवून देऊ शकत नाही का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.