नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया व तर्फे घेण्यात आलेल्या ७७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धा दि दहा ते तेरा सप्टेंबर दरम्यान मंगलोर कर्नाटक येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यात महिलांच्या गटात नाशिकच्या अदिती हेगडे हिने राज्याचे प्रतिनिधीत्व करताना एक सुवर्ण आणि चार रौप्य पदक प्राप्त करून वैयक्तिक उत्तम कामगिरी केली .
आदिती हेगडे हिने ४ बाय १०० मीटर मिक्स फ्री स्टाइल रिले प्रकारात सुवर्णपदक तर १०० मीटर आणि २०० फ्री स्पटाईल व चार बाय दोनशे, चार बाय शंभर मिडले, चार बाय शंभर मिक्स मिडले रिले प्रकारात रौप्य पदक पटकावले.
आदिती नाशिक येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलावावर सराव करत असून त्यांना प्रशिक्षक म्हणूनशंकर मादगुंडीसर आणि विकास भडांगे सर यांचे प्रशिक्षण मिळाले. तसेच तरण तलावावरच्या व्यवस्थापिका श्रीमती माया जगताप मॅडमचे मोलाचे सहकार्य मिळाले. सर्व पालक वर्गांनी कौतुक केले.