मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
वेगवेगळ्या ठिकाणी पुराव्यांकरिता आधार कार्ड ही अत्यंत महत्वाचे कागदपत्र मानले जाते. त्यामुळे आधार कार्ड हे सर्व भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. प्रत्येक अधिकृत कामात कागदपत्रे आवश्यक असतात. कर्ज घेणे असो किंवा कार खरेदी असो, कागदपत्रे सर्वत्र असणे आवश्यक आहे. अलीकडेच, आधार जारी करणारी संस्था, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने एक नव्या सुविधेची घोषणा केली आहे. एखाद्या व्यक्तीला फक्त एक मोबाईल नंबर वापरून संपूर्ण कुटुंबासाठी आधार PVC कार्ड ऑर्डर करण्याची परवानगी देईल. त्याकरिता तुमचा आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांक कोणताही असो, तुम्ही प्रमाणीकरणासाठी OTP प्राप्त करण्यासाठी कोणताही मोबाइल नंबर वापरू शकता. UIDAI ने अलीकडील ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे, एखादी व्यक्ती संपूर्ण कुटुंबासाठी आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकते.
PVC कार्ड
आधार कार्ड जारी करणारी संस्था म्हणजेच UIDAI ने Aadhar PVC कार्ड ही UIDAI ने सुरू केलेली एक नवीन सेवा आहे, ती आधार धारकाला नाममात्र शुल्क भरून PVC कार्डवर त्याचा आधार तपशील प्रिंट करण्याची सुविधा प्रदान करते. ज्या रहिवाशांकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांक नाही ते नोंदणीकृत किंवा पर्यायी मोबाइल क्रमांक वापरून ऑर्डर देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज असा करा
फक्त एका मोबाईल नंबरवरून संपूर्ण कुटुंबासाठी आधार PVC ऑर्डर करायचे असल्यास, येथे दिलेली प्रक्रिया वापरून पहा.
1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या – uidai.gov.in.
2: होमपेजवर ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ हा पर्याय दिसेल – त्यावर क्लिक करा.
3: आता 12-अंकी आधार क्रमांक किंवा 28-अंकी नावनोंदणी आयडी प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
4: योग्य कोड प्रविष्ट करा.
5: आता ‘माझा मोबाइल नंबर नोंदणीकृत नाही’ च्या पुढील चेक बॉक्सवर क्लिक करा.
6: आता मोबाईल नंबर प्रविष्ट करणे आणि ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करणे आवश्यक आहे.
7: आता, सर्व अटी आणि नियम स्वीकारा.
8: OTP पडताळणी पूर्ण करण्यासाठी सबमिट वर क्लिक करा.
9: आता 50 रुपये द्यावे लागतील.
10: आता, पेमेंट गेटवेवर पेमेंट मोड निवडा.
11: आता, एकदा पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी असलेली पावती मिळेल.