मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे मानले जाते कारण आधार कार्ड हे देशाचे नागरिक असल्याचे ओळखण्यासाठी आवश्यक कागदपत्र आहे. आजच्या काळात, सरकारी योजना, नोकरी किंवा अशा इतर सेवांचा लाभ घ्यायचा असेल, जिथे ओळखपत्राची मागणी केली जाते, तरच आधारची मागणी केली जाते. समजा एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल किंवा आधार क्रमांकासाठी नोंदणी केली नसेल, तर अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनुसार UIDAI नं स्पष्ट केलं आहे की सरकारी योजना आणि सबसिडीचे लाभ मिळवण्यासाठी आधार अनिवार्य आहे. यासाठी प्राधिकरणानं सर्व मंत्रालयं आणि राज्य सरकारांना परिपत्रकही जारी केलं आहे. या परिपत्रकात राज्य सरकारं आणि मंत्रालयांना केवळ आधार कार्ड असलेल्या नागरिकांनाच योजना आणि सबसिडीचा लाभ मिळावा, असे सांगण्यात आले आहे.
एका रिपोर्टनुसार आता आधारचे नियम अधिक कडक केले जाणार आहेत. आधारसाठी सध्याच्या सूचनांनुसार, जर एखाद्या व्यक्तीकडे आधार क्रमांक नसेल, तर तो इतर कागदपत्रे दाखवून अनुदानाचा लाभ घेऊ शकतो. मात्र, जर एखाद्या व्यक्तीकडे आधार क्रमांक नसेल, तर त्यानं त्यासाठी अर्ज करावा आणि अर्जाच्या बदल्यात मिळालेली पावती किंवा नावनोंदणी स्लिप दाखवूनच अनुदान किंवा सरकारी योजनेच्या लाभासाठी दावा करावा, असं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
आता सबसिडीचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पावती असणं आवश्यक आहे. जर एखाद्याकडे आधार नसेल किंवा त्याने आधारसाठी अर्ज केला नसेल तर त्याला इतर कागदपत्रे दाखवून सरकारी सूट आता मिळू शकणार नाही. तसेच सबसिडी आणि सूट मध्ये हेराफेरी आणि गळती रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ही गळती रोखण्यासाठीच आधार कार्ड सुरू करण्यात आले. आता अशा तरतुदी कडक केल्या जात आहेत, ज्याचा फायदा लोक घेऊ शकतात.
नवीन परिपत्रक हे निश्चित करेल की, सबसिडीचा लाभ फक्त अशा नागरिकांनाच पोहोचेल जे आधारशी लिंक आहेत किंवा जोडण्याच्या प्रक्रियेत आहेत. सध्या सरकार स्वस्त दरात राशन ते कमी दरात कर्ज अशा अनेक योजना चालवत आहे, ज्यांचे वितरण ‘आधार’च्या सहाय्यानं केलं जात आहे.
आधार कार्डचे अनेक फायदे आहेत, तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही घरबसल्या प्रॉपर्टीचे व्यवहार करू शकता. म्हणजेच आधार कार्ड धारकांसाठी मालमत्तेचे व्यवहार पेपरलेस, कॅशलेस आणि ह्युमन लेस झाले आहेत. फक्त तुमचे बँक खाते, आधार आणि बायोमेट्रिक तपशील द्यावे लागतील. तुम्ही आधार कार्डधारक असाल तर तुम्ही ई-हॉस्पिटल सेवा घेऊ शकता. यासाठी सरकारी रुग्णालये आणि मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये अपॉइंटमेंट बुक करू शकता. कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
आपण जर आधार कार्डधारक असाल तर तुम्ही ई-हॉस्पिटल सेवा घेऊ शकता. यासाठी सरकारी रुग्णालये आणि मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये अपॉइंटमेंट बुक करू शकता. महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. तुम्हाला सरकार किंवा UGC कडून कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड द्यावे लागेल. शिक्षणासाठी चालवल्या जाणार्या सर्व योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे.
Aadhar Card Government Scheme Subsidy Order
UIDAI