अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यातील साताळी येथे मराठी शाळेजवळ डीपीचे बसविण्याचे काम सुरू होते. त्यासाठी पोलवर तारा ओढण्याचे काम करत असताना गणेश छगन शिंदे (रा. तांदुळवाडी) हा युवक पोलवर चढलेला होता. पोल तिरपा होऊ लागल्याने त्याने जीव वाचवण्यासाठी खाली उडी मारली. मात्र दुर्दैव असे की तिरपा होत असलेला सिमेंट पोल त्याच्याच अंगावर कोसळला. आणि छाती आणि डोक्याला गंभीर मार बसल्याने त्याच्या छातीत रक्तस्राव झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.