मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील गर्डरशॉप भागात शेतातील कांद्याला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. रवींद्र बाळू दराडे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मनमाड – भुसावळ लोहमार्ग रेल्वे लगतच्या पाचीपुल भागातील शेतामध्ये कांद्याला पाणी देण्यासाठी तो गेला होता. यावेळी विहिरीवरील वीज पंप चालू करतांना त्याचा विहिरीत तोल गेला व तो विहिरीत पडला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या आठ दिवसात नांदगाव तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. दोन दिवसापूर्वीच मध्यरात्री विजेच्या कडकाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे नांदगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथील एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.
शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी हा शेतकरी शेतात गेला असता अंगावर वीज पडून जागीच ठार झाला. नाना गमन चव्हाण (६०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1636225843101069314?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1636225729141837824?s=20